ठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात

Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 31, 2023, 11:33 AM IST
ठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात title=

Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच 100 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ 100 लोक रेव्ह पार्टी करत होते. ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी ही संयुक्त कारवाई केली. या रेव्ह पार्टीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. या पार्टीत चरस, गांजा, दारू, एमडी अशी अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आल्या होती. याशिवाय कासारवडवलीजवळील रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी 25 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

घोडबंदर इथल्या कासारवडवली भागात एका प्लॉटवर रेव्ह पार्टी आयोजत केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास युनिट पाचच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री पार्टी सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिथे धाड मारली. पोलिसांनी सुमारे 100 तरुणांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.

रेव्ह पार्टी करत असताना पकडलेल्यांमध्ये पाच मुलींचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद होऊन पार्टीमध्ये सामील झाले होते. पार्टीमध्ये नशा करण्यासाठी एलएसडी,चरस ,गांजा सोबत त्याला वापरणारे चिलीम,अल्कोहोल अशा विविध अमली पदार्थ पुरवण्यात आले होते. दोन तरुणांनी या रेव्ह पार्टीचे आयोजन केलं होतं. ही दोन्ही मुलं कळवा आणि डोंबिवलीत राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करुन वैद्यकीय चाचणीसाठी तरुणांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलं आहे.

सरकार रेव्ह पार्टीमधूनच निर्माण झालं - संजय राऊत

राज्य सरकार रेव्ह पार्टी मधूनच निर्माण झालं आहे. गुजरातमधून अमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्र सरकारचे ड्रग्स रॅकेट गुजरात कनेक्शन आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.