कोपर पूल अवजड वाहनांसाठी बंद

डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्‍वे पूल २८ ऑगस्टपासून बंद होणार आहे.

Updated: Aug 18, 2019, 02:21 PM IST
कोपर पूल अवजड वाहनांसाठी बंद title=

डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्‍वे पूल २८ ऑगस्टपासून बंद होणार आहे. हा उड्डाणपूल कमकुवत असल्याने तो बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार वाहतूक शाखेमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व पश्चिमेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडून फलकही लावण्यात आले आहेत. 

आयआयटी पवईच्या अहवालानुसार हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ ऑगस्टपासून हा पूल बंद झाल्यानंतर डोंबिवलीकरांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. 

हा पूल बंद झाल्यानं डोंबिवलीकरांसाठी ठाकुर्लीचा पूल हा पर्यायी मार्ग असणार आहे. मात्र या ठिकाणीही मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील आहे.