शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रस्त्यावर थुंकाणाऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे रस्त्यावर घाण फेकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Updated: Aug 18, 2019, 09:20 AM IST
शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा title=

कल्याण : ऐतिहासिक आणि सांस्कृतीक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य बघायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाला या ठिकाणी नागरिकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. 

रस्त्यावर थुंकाणाऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे रस्त्यावर घाण फेकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या समस्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी काही उपाययोजना कल्याण-डोंबिवलीमध्ये राबवण्यात येत आहेत. 

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावर थुंकाणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही क्लीन अप मार्शल तैनात ठेण्यात आलेत.

कल्याण डोंबिवली शहराची स्वछता राखण्यासाठी पालिकेकडून खासगी एजन्सी मार्फत हे स्वछता मार्शल नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकसल्यास १५० रुपये, उघडयावर लघुशंका केल्यास १०० रुपये तर उघडयावर शौच केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जात आहे.