दरड कोसळून वडील- मुलाचा मृत्यू

दरड थेट घरांवर कोसळली आणि.... 

Updated: Jul 30, 2019, 07:32 AM IST
दरड कोसळून वडील- मुलाचा मृत्यू  title=

मुंबई : ठाणे हद्दीत येणाऱ्या अतनोकेश्वर नगरमधील परिसरात एक दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आदर्श मित्रमंडळ परिसरात असणाऱ्या एका भागात घरावर दरड कोसलळली आहे. या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याविषयीची अधिक माहिती अद्यापही प्रतिक्षेत आहे. 

डोंगरावरील दरड थेट घरांवर कोसळल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या परिसरात असणाऱ्या जवळपसा २० ते २५ घरांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला सुरु असणारा पाऊस पाहता येत्या काळात कोणतीही मोठी दुर्घटना नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्कता राखत या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय इमारती आणि संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळेच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.