तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G चालणार की नाही? या साध्या स्टेप्स फॉलो करुन चेक करा

5G सेवा येण्यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात त्यांचे 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. बजेट, मिड-रेंज आणि फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन्स भारतात आधीच आले आहेत.

Updated: Aug 8, 2022, 12:24 PM IST
तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G चालणार की नाही? या साध्या स्टेप्स फॉलो करुन चेक करा title=

Jio 5G Service Launch Date: देशात 4G नंतर 5G नेटवर्कची चर्चा सुरु झाली आहे. जिओ ही भारतातील टेलिकॉम उद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे. जिओने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात जिओने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz बँड मिळवले आहेत.  आपण या बँड्सकडे त्या स्वरूपात पाहिले तर कंपनीने N28, N5, N3, N77 आणि N258 बँडमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. यामध्ये, पॅन इंडिया 5G सेवा 700MHz म्हणजेच N28 बँडमध्ये उपलब्ध असेल. 

5G सेवा येण्यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात त्यांचे 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. बजेट, मिड-रेंज आणि फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन्स भारतात आधीच आले आहेत. 5G फोन अनेक बँडला सपोर्ट करतो. काही स्मार्टफोन्स 4 ते 5 बँडला सपोर्ट करतात. तर काही महागड्या फोनमध्ये 11 ते 12 बँड उपलब्ध आहेत.

कोणत्या स्मार्टफोनमध्ये Jio 5G चालेल

तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरील बँड्स असतील तर तुम्हाला 5G सेवा मिळेल. iQOO 9T काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन N1, N3, N5, N8, N28, N40, N41, N77, N78 बँडला सपोर्ट करतो. म्हणजेच या स्मार्टफोनध्ये जिओ 5G काम करेल. Redmi K50i नुकताच लाँच करण्यात आला आहे, तो N1, N3, N5, N7, N8, N20, N28A, N38, N40, N41, N77, N78 बँडला सपोर्ट करतो. म्हणजेच या फोनमध्ये जिओ 5G देखील चालेल

5G नेटवर्क तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालणार की नाही?

तुमचा सध्याचा स्मार्टफोन 5G चालेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे तुमचं मॉडेल शोधावे लागेल आणि त्याच्या वैशिष्ट्यांवर जावे लागेल. कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये, तुमचा फोन 5G ला सपोर्ट करेल की नाही हे तुम्ही पाहू शकता.