स्मार्टफोन स्लो झाला? या टिप्स वापरुन वाढेल वेग

आजच्या धकाधकीच्या जीवनात महत्त्वाची सर्व कामे फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होतात. 

Updated: Apr 27, 2021, 07:08 PM IST
स्मार्टफोन स्लो झाला? या टिप्स वापरुन वाढेल वेग  title=

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महत्त्वाची सर्व कामे फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होतात. लॅपटॉपपेक्षा जास्त उपयोग आता स्मार्टफोनचा होतो. फोनचा सतत वापर केल्यामुळे फोन काही दिवसांनी स्लो होतो. त्यामुळे कामं उशिरा होतात. तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोन स्लो झाला तर नक्की काय करायचं. या टिप्सचा वापर केला तर तुमचा फोनचा वंग नक्कीचं वाढेल यात काही शंका नाही. 

- एनिनेशन तुमच्या फोनला स्लो करतो. सॅमसंग फोनमध्ये एनिनेशन कमी करण्यासाठी सर्वात आधी सेटिंगमध्ये जा. त्यानंतर एडवांस फीचर आणि रिड्यूस एनिमेशन.

- फोनमध्ये तुमच्या ज्या गोष्टी वापरात नसतील, त्या लगेचचं डिलीट करा. ज्यामध्ये कॅशे आणि जंकचा साठा फोनमध्ये होतो. स्टोरेज रिकामा केल्यानंतर स्मार्टफोन पुर्वीसारखा काम करू लागेल. 

- तुम्ही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असाल, तर डेटा कॅश जमा होतो. काही वेळा कॅश २ जीबीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही सेटिंग्जमध्ये जावून डिलीट करू शकता. 

- लाईव्ह वॉलपेपरमुळे आपल्या फोनला एक हटके लूक येतो. वॉलपेपरमुळे स्मार्टफोनची बॅट्री कमी होते. त्यामुळे फोन बंद होतो. म्हणून  लाईव्ह वॉलपेपरचा वापर टाळा. 

- जेव्हा आपण लॅपटॉपला फोन  जोडतो. त्यावेळी  डेटा ट्रान्सफर करुन घेताना आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जाण्याची शक्यता असते.  अशावेळी आपण मोबाईलचा व्हायरसपासून बचाव करायला हवा. यासाठी Settings > Google > Security > Google Play Protect > Turn on या क्रमाने सेटींग्जमध्ये बदल करा.