Mobile Phone Hacking : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करणार नाही. डिजिटल जगात फोटो क्लिक करण्यापासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत स्मार्टफोनचा वापर करत असतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन बँकिंग (online baking) आणि सोशल मीडियाच्या वापरादरम्यान हॅकिंग (Phone Hacking) आणि डेटा लीकचा धोका हा मोठा प्रमाणात असतो. संगणकापेक्षा स्मार्टफोन हॅक (Smartphone Hack) करणे हे हॅकर्ससाठी सोपे आहे. अनेक रिसर्च आणि ऍपलच्या दाव्यानुसार ऍपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे. पण याचा अर्थ आयफोन हॅक होऊ शकत नाही असे नाही. Android फोन हॅक करणे सोपे आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे पाच संकेत दिसले तर समजून जा तुमचा मोबाईल हॅक झाला आहे.
जर तुमच्या मोबाईलची सिस्टीम सतत बंद होत असेल किंवा आपोआप रिस्टार्ट होत असेल तर तुमची सिस्टीम हॅक झाली असू शकते. याशिवाय, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोन आणि कॉम्प्युटरची सेटिंग्ज आपोआप बदलली आहेत तर सावधान राहा. याचा अर्थ हॅकर्सना तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळाला आहे. डाउनलोड केलेली फाईल ताबडतोब तपासा किंवा फोन त्वरित फॉरमॅट करा.
वाचा : झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी
फोन हॅक होण्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन मेसेज येत असतात. बर्याच वेळा असे घडते की तुम्ही कोणतीही वस्तू घेतलेली नसते तरीही तुमच्या बॅंक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. याचा अर्थ असा की कोणीतरी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकिंग तपशील ताब्यात घेतले आहेत. असे झाल्यास ताबडतोब बँकेची मदत घ्या आणि खात्यातून व्यवहार बंद करा.
तुमचा स्मार्टफोन अचानक खूप स्लो चालत असेल तर काळजी घ्या. बर्याच वेळा हॅकर्स बिटकॉइन्स करण्यासाठी तुमची प्रणाली वापरतात. याशिवाय इंटरनेटचा स्पीड चांगला असतानाही फोनवर व्हिडिओ स्लो चालत असेल किंवा तुमचा डेटा जास्त वापरला जात असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.
फोन हॅक करण्यासाठी हॅकर्स कधीकधी अँटी व्हायरस आणि सुरक्षा सॉफ्टवेअर बंद करतात. तुमचा अँटी व्हायरस काम करत नसल्याची शंका असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त, नेहमी तुमचा ब्राउझर तपासत राहा, कारण तुमच्या ब्राउझरमध्ये एक्स्टेंशन आहे आणि ते तुमची हेरगिरी करत आहे. बर्याच वेळा वेबसाईटच्या माध्यमातून काही एक्स्टेंशन किंवा सॉफ्टवेअर सिस्टममध्ये येतात आणि त्याद्वारे हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फोनचे अॅप सतत अपडेट करत राहा.
जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक लवकर संपत असेल. तरीही तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये कोणताही मालवेअर टाकला तर तो फोनच्या बॅकग्राउंडमध्ये काम करतो. आणि बॅटरी लवकर संपते. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे.