तुमच्या फोनमध्ये Virus लपलाय का? त्याला असं शोधून काढा

फोनमधील व्हायरस लवकर ओळखून काढला पाहिजे आणि त्याला काढून देखील टाकला पाहिजे.

Updated: Oct 19, 2021, 12:08 PM IST
तुमच्या फोनमध्ये Virus लपलाय का? त्याला असं शोधून काढा title=

मुंबई : जर तुमचा फोन स्लो झाला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की, कदाचित त्यात व्हायरस आला असावा, तर तुम्हाला ते शोधण्यात नक्कीच अडचण आली असेल. कारण व्हायरस सहसा आपल्या फोनमध्ये लपलेले असतात, त्यामुळे ते आपल्याला लगेच दिसत नाही. असे बरेच अ‍ॅप्स तुम्हाला मिळतील जे व्हायरसला तुमच्या फोनमधून स्कॅन करायला आणि काढून टाकण्यासाठी मदत करतो. हे अ‍ॅप फोन स्कॅन केल्यानंतर आपल्या फोन 100% सुरक्षित दर्शवतात. पण त्यानंतरही फोन चालवताना अडचण येते. अशावेळी काय करता येईल? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला यासाठी काय करावे हे सांगणार आहोत.

व्हायरसमुळे फोनचे खूप नुकसान होऊ शकते

फोनमधील व्हायरस लवकर ओळखून काढला पाहिजे आणि त्याला काढून देखील टाकला पाहिजे, अन्यथा हे व्हायरस तुम्हाला खूप नुकसान करू शकतात. अनेक व्हायरस असे देखील आहेत, जे तुमच्या फोनवर अ‍ॅप किंवा मेसेजद्वारे येतात आणि तुम्हाला हे माहित देखील नसतं परंतु असे व्हायरस तुमचा डेटा देखील चोरू शकतात.

आपल्या स्मार्टफोनला व्हायरस आणि मालवेअरपासून कसे संरक्षित करावे?

आजच्या काळात हॅकर्सनी अत्यंत सावधगिरीने काम करण्यास सुरुवात केली आहे. ते वापरकर्त्यांची प्रणाली आणि खाती व्हायरसद्वारे हॅक करतात. म्हणूनच सर्वप्रथम अ‍ॅप डाऊनलोड करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या फोनमध्ये कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप्स ठेवू नका, तसेच हे अ‍ॅप्स अनेक प्लॅटफॉर्मवर चेक करा, जेव्हा तुम्हाला ते सेफ असल्याची जाणीव होईल तेव्हाच त्याला इंस्टॉल करा.

असे कोणतेही बनावट अ‍ॅप टाळण्यासाठी, आपण फक्त Google Play Store किंवा App Store सारख्या प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅप डाउनलोड करण्याची काळजी घ्यावी.

तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे कसे ओळखावे?

अनेक वेळा असे घडते की, अत्यंत सावधगिरी बाळगल्यानंतरही काही व्हायरस किंवा मालवेअर तुमच्या फोनमध्ये शिरतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या फोनमध्ये व्हायरस कसा शोधू शकता हे जाणून घ्या.

-जर पैसे कमवण्यासाठी तुमच्या फोनवर मेसेज, कॉल किंवा त्याची जाहीरात वारंवार दिसत असतील तर याचा अर्थ असा की, तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे.

-जर तुमच्या फोनवर अनेक जाहिराती आल्या तर याचा अर्थ व्हायरसने तुमच्या स्मार्टफोनला संक्रमित केले आहे.

-मालवेअर आणि ट्रोजन स्पॅम मेसेज पाठवण्यासाठी आपला स्मार्टफोन वापरू शकतात.

-जर तुमच्या स्मार्टफोनची प्रोसेसिंग स्पीड खूप मंद असेल तर ते व्हायरसमुळे देखील होऊ शकते.

-व्हायरस आणि मालवेअर आपल्या स्मार्टफोनवर नवीन अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात, म्हणून असे झाल्यास सावधगिरी बाळगा.

-ऑटोमॅटीक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्स आणि अज्ञात क्रमांकावरील संदेश देखील आपला डेटा जलद वापरू शकतात, तसेच जर तुमचा डेटा वेगाने संपत असेल तर त्याला व्हायरसचा सिग्नल माना.

-जर तुमचा स्मार्टफोन नवीन आहे आणि त्याची बॅटरी जास्त काळ टिकत नाही, तरी देखील त्यात व्हायरस असू शकतो.