मुंबई : घावण हा एक तांदळाच्या पिठापासून बनवला जाणारा पदार्थ आहे, कोकणात घावणची लोकप्रियता जास्त आहे. कोकणाशिवाय महाराष्ट्रातील इतर प्रांतातही घावणे केले जातात. यात फरक एवढाच आहे की प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळी नावं आहेत. संबंधित व्हिडीओ हा डोंबिवली पूर्वमधील आहे. निखिल नावाच्या युवकाने हा स्टॉल सुरू केला आहे, अगदी 15 रूपयात तुम्हाला एक घावणे खायला मिळतं. एवढंच नाही यासोबतची चटणी दिली जाते, ती या घावणंची चव अधिक वाढवत असतं.
निखिल २६ वर्षांचा आहे. निखिल मागील १० महिन्यापासून डोंबिवली पूर्वमध्ये स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाजवळ हा स्टॉल चालवतो. सकाळी ७ ते ११ दरम्यान निखिल हा स्टॉल चालवतो.
निखिल हे आपल्या घरातून शिकला आहे. निखिलला लहाणपणापासून खाद्यपदार्थ बनवण्याची आवड आहे. तो आधी चित्रपट निर्मिती क्षेत्रात होता, पण रोजचा प्रवास आणि रात्रपाळीच्या कामामुळे त्याला याचा त्रास होत होता. म्हणून त्याने हा उद्योग निवडला आहे.
मला लहानपणापासून सर्वपदार्थ बनवण्याची आवड आहे, आणि हा पदार्थ जेव्हा बनवला जात होता, तेव्हा मी हे सारं निरीक्षणातून शिकलो असल्याचं निखिल सांगतो, म्हणून जेव्हा कधी तुम्ही डोंबिवली पूर्वमध्ये जाल तेव्हा निखिल बनवलेल्या घावणाचा नक्कीच आस्वाद घ्या.