Yamaha लवकरच लॉन्च करणार स्पोर्टस बाईक, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

यामाहाची आणखी एक बाईत लवकरच बाजारात

Updated: Sep 10, 2019, 01:08 PM IST
Yamaha लवकरच लॉन्च करणार स्पोर्टस बाईक, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत title=

मुंबई : यामाहाने आपली शानदार स्पोर्ट्स बाईक यामाहा YZF-R3 चा नवा मॉडेल लॉन्च केला आहे. 2020 Yamaha YZF-R3 दोन वेगवेगळ्या रंगात लॉन्च झाली आहे. ज्यामध्ये मिड नाईट ब्लॅक आणि आयकॉन ब्लू रंगाचा समावेश आहे. ही नवी यामाहा वाईजेडएफ-आर3 भारतात या वर्षाच्या शेवटी लॉन्च होणार आहे. नवी बाईक ही आकर्षित करणारी आहे. यामध्ये अपग्रेडेड सस्पेंशन आणि नवे फीचर्स आहेत. नवी यामाहा आर3 कंपनीच्या MotoGP YZR-M1 बाईक प्रमाणे आहे. 

नव्या बाईकमध्ये ड्यूल एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. ज्यामुळे बाईकचा लूक आणखी चांगला दिसत आहे. हेडलॅम्प्समध्ये एक सेंट्रल एयर इनटेक स्लॉट आहे. ज्यामध्ये इंजिन थंड राहावं म्हणून हवेसाठी जागा देण्यात आली आहे. इंजिन थंड राहण्यासाठी एअर डक्ट, ओवरलॅपिंग फेयरिंग पॅनलचं कॉम्बिनेशन आहे.

फ्यूल टँकची डिझाईन ही सध्याच्या मॉडेल प्रमाणेच आहे. बाईकचे साइड पॅनल्स अपग्रेड आहेत. या बाईकमध्ये नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. ज्यामध्ये बाईक संदर्भात माहिती मिळते.

नवी यामाहा आर3 मध्ये 321 सीसी, लिक्विड कूल्ड, इनलाईन 2-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 42 hp च्या पावरच असून 29.6 Nm टॉर्क जनरेट करतो. इंजिनमध्ये 6-स्पीड गेअरबॉक्स आणि अडवांस्ड फ्यूल इंजेक्टेड सिस्टम देण्यात आलं आहे. सुरक्षिततेसाठी यात ड्यूल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे.

आर3 या बाईकची किंमत सध्या बाहेर आलेली नाही. पण याची किंमत अंदाजे 3.80 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतात या बाईकची स्पर्धा कावासाकी निन्जा 300, केटीएम आरसी 390 आणि बेनेली 302 आर सोबत आहे.