Xiaomi ने लाँच केला स्वस्तात मस्ता स्मार्टफोन, 50 MP कॅमेरा, 5G अन् बरंच काही...

Redmi 5G New Phone: बजेट कमी आहे तर काळजी करु नका. तुमच्या बजेटमध्येच रेडमी एक नवा फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 10, 2023, 04:15 PM IST
 Xiaomi ने लाँच केला स्वस्तात मस्ता स्मार्टफोन, 50 MP कॅमेरा, 5G अन् बरंच काही...  title=
Xiaomi Redmi 13R 5G Price Launch With 50MP Camera

Redmi 5G New Phone: नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक स्मार्टफोन्स लाँच होण्याची शक्यता असते. येणाऱ्या काळात अनेक मोठे - मोठे ब्रँड्स त्यांचे लेटेस्ट स्मार्टफोन्स बाजारात लाँच करतील. यापूर्वीच रेडमी 13R 5G या फोनचे नाव समोर आले आहे. Xiaomi कंपनीने चीनी बाजारपेठेत हा फोन लाँच केला आहे. भारतात लाँच झालेल्या 13C 5G सोबत या फोनचे फिचर्स बरेचशे मिळते जुळते आहेत. 

या बजेट 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी  आहे. Redmi 13C 5G प्रमाणे, या फोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनची किंमत आणि त्यात असलेले फिचर्स जाणून घेऊया. 

रेडमी 13R 5G फोनची किंमत

कंपनीने हा स्मार्टफोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे, 4GB RAM + 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. Redmi 13R 5G हा तीन रंगांमध्ये येतो. स्टार रॉक ब्लॅक, फॅन्टसी पर्पल आणि वेव्ह वॉटर ग्रीन, असे तीन रंग उपलब्ध आहेत. कंपनीने याची किंमत 999 युआन (भारतीय रुपयांनुसार सुमारे 11,700 रुपये) इतकी ठरवली आहे. 

फोनचे स्पेसिफिकेशन काय?

Redmi 13R 5G मध्ये 6.74 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरवर काम करतो. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. हँडसेट Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. 

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात 50MP मुख्य लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर 5000mAh बॅटरीची क्षमता आहे. स्मार्टफोन 18W चार्जिंगला सपोर्ट करतो. सुरक्षिततेसाठी, Redmi 13R 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. डिव्हाइस मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह येतो. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक पोर्ट आहे.