'हा' फोन आहे आयफोनला उत्तम पर्याय !

अॅपलचा फोन आपल्याकडे देखील असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या फोनच्या खास लुकमुळे तो आकर्षक दिसतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 10:30 AM IST
'हा' फोन आहे आयफोनला उत्तम पर्याय ! title=

नवी दिल्ली : अॅपलचा फोन आपल्याकडे देखील असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या फोनच्या खास लुकमुळे तो आकर्षक दिसतो. पण त्याच्या किंमती आवाक्याबाहेर असतात. चायनीज अॅपल अशी ओळख असलेल्या शाओमी कंपनीने Mi A1 हा नवा फोन बाजारात आणला आहे. हा फोन फक्त आयफोनसारखा दिसत नाही तर त्याचे फीचर्स देखील बहुतांशी सारखेच आहेत. फोटो काढण्याची आवड असलेल्यांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय आहे. कारण या फोनची फोटो क्वालिटी आयफोन ७ पेक्षा देखील चांगली आहे. 

Mi A1 या स्मार्टफोनमध्ये MIUI ऑपरेटिंग सिस्टम ऐवजी गुगलच्या Android one स्टॉक अॅनरॉईड दिले आहे. तसंच ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले २.५ डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसहीत मिळत आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्पेनड्रॅगन ६२५ प्रोसेसरवर काम करत आहे. लेटेस्ट अॅनरॉईड ओएस ७.१.२. नूगा वर हा फोन काम करेल. 

फोनमध्ये ४ जीबी रॅमसहीत ६४ जीबी इंटर्नल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डसोबतच १२८ जीबी पर्यंत मेमरी एक्सपांड होऊ शकते. त्याचबरोबर Mi A1 मध्ये डुअल सिम स्लॉट आहे. जर तुम्हाला मायक्रो एसडी कार्ड वापरायचे नसल्यास तुम्ही दोन नॅनो सिम वापरू शकता. 
या फोनचा कॅमेरा हे याचे खास वैशिष्ट्य आहे. यात १२ मेगापिक्सलचे दोन रियल कॅमेरे आहेत. त्यापैकी एक f २.२ अपर्चर वाईल्ड अँगल लेन्स आहे तर दुसरा f २.६ अपर्चर असलेला टेलीफोटो लेन्स आहे. या फोनमध्ये २x चे ऑप्टिकल झूम आणि १०x पर्यंत डिजिटल झूमची सुविधा देण्यात आली आहे. 

व्हिडीओ चॅट आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. आयफोन ७ आणि वनप्लस ५  पेक्षा या फोनचा कॅमेरा उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Mi A1 मध्ये ४G VoLTE असण्याबरोबर वाय फाय, ब्लुटूथ आणि ३.५ एमएम ऑडियो जक आहे. यातून टाइप चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. पावर बॅकअप साठी ३०८० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.