स्टोरेजची चिंता मिटवणारं व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेकांना स्टोरेजची अडचण जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅप यासाठी एक नवं फीचर आणणार आहे. ज्यामुळे तुमचं स्टोरेजच टेन्शन कमी होणार आहे.

Updated: Sep 19, 2017, 09:12 AM IST
स्टोरेजची चिंता मिटवणारं व्हॉट्सअॅपचं नवं फीचर title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेकांना स्टोरेजची अडचण जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅप यासाठी एक नवं फीचर आणणार आहे. ज्यामुळे तुमचं स्टोरेजच टेन्शन कमी होणार आहे.

कारण अँड्रॉईड युझर्सनाही आता आयफोनप्रमाणे स्टोरेज कंट्रोल करता येईल. 

आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरत असलेल्यांना ज्यामुळे चॅटमधून थेट स्टोरेज ऑप्शनमध्ये जाण्याची सोय आहे. यामध्ये किती मीडिया फाईल्स सेंड केल्या आणि किती मेसेज सेंड केले याची माहिती मिळते. या फाईल्स आणि स्टोरेज क्लिअर केल्यानंतर रॅम फ्री होते. म्हणजे तुमचा फोन स्लो होत नाही. आतापर्यंत हे फीचर केवळ आयफोनसाठीच होतं. आता अँड्रॉईड युझर्सनाही हे फीचर दिलं जाणार आहे. 

दरम्यान व्हॉट्सअॅप लवकरच रिव्होक नावाने मेसेज अनसेंड करण्यासाठी फीचर लाँच करणार आहे. यामुळे तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज तुम्ही रिव्होक करु शकता. लवकरच ही नवी अपडेट जारी केली जाणार असल्याचीही माहिती आहे.