शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली

यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती.

Updated: May 22, 2018, 05:53 PM IST
शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली title=

नवी दिल्ली : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीनं Mi Mix 2 स्मार्टफोनच्या किंमती सहा हजार रुपयांनी घटवल्यात. या प्रिमिअम स्मार्टफोनला कंपनीनं ऑक्टोबर 2017 मध्ये 35,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केलाय. किंमतीत एवढी मोठी कपात झाल्यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. कमी झालेली किंमत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टसोबतच कंपनीच्या Mi Home मध्येही लागू होईल. 

यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती. आता कंपनीनं या सीरिजचे पुढचे स्मार्टफोन Mi Mix 2S लॉन्च केलेत. हा स्मार्टफोन अद्यापही भारतीय बाजारात लॉन्च झालेला नाही...  Mi Mix 2S लॉन्च झाल्यामुळेच कंपनीनं आपल्या  Mi Mix 2 च्या किंमतीत कपात केल्याचं सांगितलं जातंय. 

डिस्प्ले 

Mi Mix 2 मध्ये 1080  X 2160 पिक्सलचा 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे. आयपीएस एलसीडी केपेसिटिव्ह टच स्क्रीन असणाऱ्या डिस्प्लेमध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात आलाय. 

प्लॅटफॉर्म 

शाओमीचा नवा फोन अॅन्ड्रॉईड 7.1 नोगटवर काम करतो. यात क्वॉलकॉम MSM898 स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आलाय. शाओमी Mi MIX 2 मध्ये 3500 mAhची बॅटरी आहे. या फोनमध्ये USB Type - C चार्जिंग पोर्ट देण्यात आलाय. फोनमध्ये नॉन रिमूवल बॅटरी आहे. 

रॅम आणि मेमरी 

फोनमध्ये कंपनीकडून कोणताही कार्ड स्लॉट देण्यात आलेला नाही. याचे 6 जीबी आणि 8 जीबी असे दोन व्हेरिएन्ट आहेत. फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी इंटरनल मेमरीसोबत उपलब्ध आहे. परंतु, भारतीय बाजारात मात्र याचा केवळ 128 जीबी व्हेरिएन्ट खरेदी केला जाऊ शकेल. 

कॅमेरा 

कॅमेरा क्वॉलिटीमध्यो शाओमीचा फोन उत्तम समजला जातो. Mi MIX 2 मध्ये 12 MP चा बॅक कॅमेरा आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याचा फ्रंट कॅमेरा युझरचा चेहरा ओळखण्यात सक्षम आहे. तसंच यात फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलाय.