Recharge Plan: आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक मोबाईल सुरु राहण्यासाठी लागत एखाद्या कंपनीचं सिमकार्ड आणि सिमकार्ड सुरु राहण्यासाठी लागतो रिचार्ज. आपल्याला दरमहिन्याला रिचार्जसाठी थोडे पैसै बाजुला काढून ठेवावेच लागतात. खपू महागडा स्मार्टफोन असेल पण त्यात सिमकार्ड नसेल तर तो काही कामाचा नाही. आपला रिचार्ज प्लानसाठी 30 दिवसांचे पैसे घेतात पण रिचार्ज 28 दिवसांचा देतात. असं का होतं? विचार केलाय का?
सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा. पण आता सर्व कंपन्यांच्या रिचार्जची वॅलिडीटी सारखीच असते. कंपन्या ग्राहकांसोबत असे का करतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
वर्षाचे 12 महिने असतात. यात फेब्रुवारी 28 दिवसांचा, कोणता महिना 31 महिना तर कोणता महिना 30 दिवसांचा असतो. यामुळे ग्राहकांना 12 ऐवजी 13 महिन्यांचा रिचार्ज करावा लागतो. जर कंपनीने पूर्ण 30 दिवसांचा प्लान दिला तर त्यांचे यात नुकसान होते.
हे नुकसान वाचवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचा रिचार्ज प्लान ऑफर करतात. असे केल्यास त्यांच्याकडे 2 ते 3 दिवस शिल्लक उरतात. यामागे टेलिकॉम कंपन्यांची हुशारी असते.
टेलीकॉम कंपन्यांना 28 दिवसांच्या प्लान संदर्भात TRAI ने गाईडलाईन्स जाहीर केली होती. पण आतापर्यंत TRAI ने यावर कोणती अपडेट दिली नाही. त्यामुळे अद्यापही सर्व कंपन्यांचा मोबाईल रिचार्ज आधीप्रमाणे 28-28 दिवसांचा सुरु आहे. यामुळे ग्राहकांना वर्षाला 12 ऐवजी 13 रिचार्ज करावे लागतात.