त्रिवागोच्या जाहिरातीतील या व्यक्तीबद्दल घ्या जाणून

तुम्ही टीव्ही पाहता का? तुम्ही यूट्य़ूबवर व्हिडीओज पाहता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही त्रिवागोची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. तसेच या जाहिरातीतील मुख्य वाक्य म्हणजे क्या आपने कभी ऑनलाईन हॉटेल सर्च किया है? 

Updated: Jul 31, 2017, 10:40 AM IST
त्रिवागोच्या जाहिरातीतील या व्यक्तीबद्दल घ्या जाणून title=

मुंबई : तुम्ही टीव्ही पाहता का? तुम्ही यूट्य़ूबवर व्हिडीओज पाहता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही त्रिवागोची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. तसेच या जाहिरातीतील मुख्य वाक्य म्हणजे क्या आपने कभी ऑनलाईन हॉटेल सर्च किया है? 

त्रिवागोच्या जाहिरातीत हे वाक्य म्हणणारा ती व्यक्ती सध्या इंटरनेटवर चांगलीच प्रसिद्ध झालीये. त्रिवागोच्या जाहिरातीत तुम्ही त्या व्यक्तीला नेहमीच पाहता मात्र फार कमी जणांना त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे अभिनव कुमार. अभिनव हे त्रिवागोचेच भारतातील डेव्हलपमेंट हेड आहेत. 

रिपोर्टनुसार, ते जर्मनीच्या डुसेलडोर्फ शहरात राहतात. त्रिवागोची जाहिरात आल्यानंतर अनेकांनी या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे जाहिरातीत प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे वापरले जातात. मात्र या जाहिरातीतील अभिनव कुमार यांचा चेहरा नेटकऱ्यांसाठी नवीनच होता. त्यामुळे ज्याप्रमाणे एअरटेल गर्ल साशा लोकप्रिय झाली त्याचप्रमाणे सध्या अभिनव कुमार नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेत. 

काही दिवसांपूर्वी तर अभिनव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यात साम्य असल्या कारणाने ट्विटरवर ट्रोलही झाले होते.