मुंबई : आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप काही काळानंतर नवनवीन प्रयोग करत असतं. यावेळेसही व्हॉट्सअॅप काही नवे फिचर्स घेऊन येतयं. या फिचर्सच्या मदतीने युजर्सचं व्हॉट्सअॅप वापरण अधिक सोपं होणार आहे. एक चांगला अनुभव युजर्सना घेता येणार आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये 'स्वाइप टू रिप्लाय' हे फिचर्स येत्या काळात पाहायला मिळणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मेसेजला तात्काळ उत्तर देऊ शकणार आहात. उत्तर देण्यासाठी मेसेजला केवळ स्वाइप करावं लागणार आहे. राइट स्वाइप केल्यास मेसेज सेंड होऊ शकतो.
व्हॉट्सअॅप आपल्या नव्या 'पिक्चर इन पिक्चर' फिचर्सचीही टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स युट्यूब, फेसबुकचे व्हिडिओ व्हॉट्सअॅप चॅटमध्ये प्ले करु शकतात.
यासोबतच व्हॉट्सअॅप फोटोशी जोडलेलं आणखी एक फिचर लवकरच समोर येतयं. नव्या 'इनलाइन फिचर'च्या मदतीने युजर्स व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या फोटो हे प्रिव्ह्यू नोटीफिकेशनमध्ये दिसणार आहेत. या मेसेजच्या जागी सध्या फक्त कॅमेराचा आयकॉन दिसतो.
लवकरच तुम्हाला व्हॉट्सअॅपचे नवे स्टिकर्सही पाहायला मिळू शकतात. यावर्षी फेसबुकच्या एफ 8 डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कंपनीने याची घोषणा केलीयं. सध्या कंपनीतर्फे ‘Biscuit’ नावाच्या स्टीकरची टेस्टिंग सुरू आहे.
थोड्या दिवसात तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही जाहीराती दिसू लागणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या स्टेटसमध्ये या जाहीराती दिसतील. इंस्टाग्रामच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारच्या जाहीराती दिसायला सुरूवातही झालीयं.