WhatsApp वापरतांना या ५ चुका पडू शकतात महागात, येऊ शकते जेलमध्ये जाण्याची वेळ

भारतात 340 million लोक  Whats App चा वापर करतात. ज्याच्याकडे अॅन्डरॉइड मोबाईल आहे.

Updated: Mar 29, 2021, 10:25 PM IST
 WhatsApp वापरतांना या ५ चुका पडू शकतात महागात, येऊ शकते जेलमध्ये जाण्याची वेळ title=

मुंबई : भारतात 340 million लोक  Whats App चा वापर करतात. ज्याच्याकडे अॅन्डरॉइड मोबाईल आहे. जवळपास  प्रत्येक व्यक्ती विविध गोष्टींसाठी Whats Appचा  वापर करतो. तुम्ही Whats App वापर करता, पण तुम्हांला त्यातल्या काही महत्वाची  माहिती असणे गरजेचे आहे? Whats App वापरायला अगदी सोप वाटत असलं तरी Whats App च्या बाबतीत नकळत 'या' चुका झाल्यास तुमच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते.  

ऑटो बॅकअप

तुम्ही तुमच्या whats app account ला बॅकअप पर्याय ठेवल्यास तुमचा बॅकअप Googleकिंवा इतर कोणत्याही क्लाउड सर्व्हरवर सेव्ह केला जातो. पण तुम्ही ज्या अकाउंटवर  तुमचं बॅकअप सेव्ह करता नकळत तेच अकाउंट जर कुणाच्या हातात लागलं, तर मोठी गडबड होऊ शकते. म्हणूनच बॅकअप घेण्याऐवजी तुमचा डाटा एक्सपोर्ट करुन कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी सेव्ह करुन ठेवा.  

टू स्टेप वेरिफिकेशन इनेबल करा

तुमचा डेटा सिक्युर ठेवण्यासाठी टू स्टेप वेरिफिकेशन हा एक उत्तम सिक्युरीटी पर्याय आहे. यामध्ये तुम्हांला पासवर्डसह  एक पिन देखील सेट करावा लागेल. म्हणजे जर तुमचा फोन चुकीच्या हातात गेला असेल तरी पिनशिवाय तो व्हॉट्सअॅप वेब वापरू शकणार नाही आणि  तुमचा डेटा सुरक्षित असेल.

अज्ञात लोकांचा contact number save करू नका

बर्‍याच वेळा तुमाही टॅक्सी, डिलिव्हरी बॉय किंवा कोणत्याही सर्व्हिस व्यक्तीचा contact number save करता आणि नंतर तो Delete करणं  विसरता. त्यानंतर तो व्यक्ती  तुमचा प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस सहज बघू शकतो. म्हणूनच कधीही अज्ञात लोकांचा contact numberसेव्ह करू नका.

अश्लील Content Share करू नका

 अश्लील Content Share केल्यास तुम्ही  अडचणीत येऊ शकता.  तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकतं किंवा पोलीस कम्पलेंट झाल्यास तुमच्यावर जेलमध्ये जायची वेळही येवू शकते. यांसह कुठलाही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्या  मेसेजमधला मजकूर सत्य आहे की बनावट ही शहानीशा करून घेणे आवश्यक आहे.