मुंबई: WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असतं. आता सोयीचं व्हावं यासाठी Whatsapp ने UPI पेमेंट देखील सुरू केलं आहे. WhatsApp ने गेल्या महिन्यात आपल्या UPI-आधारित पेमेंट सेवेसाठी कॅशबॅकची चाचणी सुरू केली. व्हॉट्सअॅपने आता हे फीचर एन्ड्रॉइड बीटा युझर्ससाठी आणण्यास सुरुवात केली आहे.
या ऑफरसह, WhatsApp फोन पे आणि गुगल पे सारख्या अनेक पेमेंट कंपन्यांना टक्कर देत आहे. तुम्ही हा कॅशबॅक कसा मिळवू शकता आता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इतकच नाही तर किती वेळा कॅशबॅक मिळू शकतो ते जाणून घ्या.
एन्ड्रॉइडवरील व्हॉट्सअॅप बीटा अॅपने चॅट लिस्टच्या वरती पैसे द्या आणि कॅशबॅक मिळवा असा पर्याय दिला आहे. वेगवेगळ्या लोकांना तुम्ही पैसे पाठवून 51 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. 51 रुपयांच्या पाचपट देखील कॅशबॅक मिळू शकतो. व्हॉट्सअॅपने या कॅशबॅक ऑफरसाठी किती रक्कम असेल तर कॅशबॅक मिळेल ही रक्कम सेट केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पेमेंट केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात 51 रुपयांचा कॅशबॅक ट्रान्सफर केला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. कॅशबॅक मिळण्याची पूर्ण कंपनीकडून देण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 5 वेळाच कॅशबॅक मिळू शकतो हे देखील सांगण्यात आलं आहे.
आता यातील गोम अशी की सध्या हे वैशिष्ट्यं फक्त Android च्या बीटा युझर्स साठी उपलब्ध आहे. लवकरच ते सर्व युझर्ससाठी उपलब्ध होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे.
व्हॉट्सअॅप युझर्सना UPI पेमेंट वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही ऑफर घेण्यात आल्याचे दिसते. Google Pay ने स्क्रॅच कार्डद्वारे रु. 1,000 पर्यंतचा कॅशबॅक देखील भारतात पहिल्यांदा लॉन्च केला तेव्हा ऑफर केला होता. त्यानंतर मात्र कॅशबॅक ऐवजी कूपन सुरू झालं.