मुंबई : आजकाल व्हॉट्सअॅप हे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास असते. पण या वर्षअखेरीख व्हॉट्स अॅप काही फोनसाठी आपली सेवा खंडीत करणार आहे. यापूर्वीही व्हॉट्स अॅपबाबत अशा बाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढ आता अखेर संपणार आहे.
ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १० आणि विंडो फोन ८.० या फोनमधून व्हॉट्स अॅप वापरणे आता नव्या वर्षात शक्य होणार नाही अशी माहिती कंपनीने अधिकृत पोस्टमार्फत दिली आहे.
ब्लॅकबेरी आणि विंडोजप्रमाणेच नोकियाची एस ४० सिरीज, नोकिया सिम्बियन एस ६०, अँड्रॉइड २.१, अँड्रॉइड २.२ या फोनमधूनही व्हॉट्स अॅप सेवा कायमस्वरूपी बंद होणार आहे.
२०१६ साली पहिल्यांदा या सर्व फोनमधून व्हॉट्स अॅप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. त्यानुसार वर्षभरापूर्वीच व्हॉट्स अॅपची सेवा बंद होणार होती. मात्र त्यावेळेस कंपनीने मुदत वाढवून सेवा ३० जून २०१७ पर्यंत वाढवली होती. पुन्हा कंपनीने ही वाढ ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत केली होती.