WhatsApp Messages डिलीट झाले, तर 'असे' करा रिकव्हर, पाहा डिटेल्स

व्हॉट्सअॅप अधिक मजेदार करण्यासाठी युजर्स कायमच नव- नवीन युक्त्या शोधत राहतात. व्हॉट्सअॅपची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी युजर्सना अद्याप माहिती नाहीत. यामध्ये बऱ्याचदा लोक व्हॉट्सअॅपवर अनावश्यक मेसेज डिलीट करतात. परंतु,

Updated: Aug 19, 2022, 12:35 PM IST
WhatsApp Messages डिलीट झाले, तर 'असे' करा रिकव्हर, पाहा डिटेल्स  title=

मुंबई: भारतात WhatsApp चे  कोट्यावधी users आहेतय. यात युजर्स चॅट करू शकतात. तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतात. व्हॉट्सअॅप अधिक मजेदार करण्यासाठी युजर्स कायमच नव- नवीन युक्त्या शोधत राहतात. व्हॉट्सअॅपची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी युजर्सना अद्याप माहिती नाहीत. यामध्ये बऱ्याचदा लोक व्हॉट्सअॅपवर अनावश्यक मेसेज डिलीट करतात. परंतु, कधी कधी यात महत्त्वाचे मेसेज देखील हटवले जातात. असे झाल्यास वैताग येतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी  पण एक सोप्पी ट्रिक वापरून तुम्ही ते पुन्हा वाचू शकतात.  लवकरच व्हॉट्सअॅप युजर्सना एक नवीन फीचर मिळणार आहे, ज्याची बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे.  

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर कसं काम करणार ? 

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, चॅटिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतर्गत, युजर्स चॅटिंग करताना 'Undo' बटण वापरू शकणार आहेत. या फीचरमुळे तुम्ही डिलीट केलेला मेसेज परत मिळवू शकाल. वास्तविक, अनेक वेळा असे घडते की 'डिलीट फॉर एव्हरीवन' ऐवजी तुम्ही 'डिलीट फॉर मी' असं करता. त्यामुळे समोरच्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज उडवणं कठीण होतं. हे फीचर अशा वेळेसाठी कामी येणार आहे. तुम्ही मेसेज 'डिलीट फॉर मी' करताच तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये तुम्हाला डिलीट केलेला मेसेज 'Undo' करण्याचा पर्याय दिला जाईल. हा पर्याय तुम्हाला फक्त काही सेकंद किंवा मिनिटांसाठी दिला जाईल. हे फीचर टेलिग्राम सारख्या इतर चॅटिंग अ‍ॅप्सवर आधीपासूनच उपलब्ध आहे.

इतरांनी डिलीट केलेले मेसेज कसे वाचता येतील?
 दुसऱ्या युजर्सचा डिलीट झालेला मेसेज वाचण्याची एक सोपी युक्ती आहे. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कोणताही डिलीट केलेला मेसेज रि-रीड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन करावी लागेल. फोनवर मेसेज येताच. त्याची सूचना मिळेल. आपण असे गृहीत धरूया की कोणीतरी मेसेज पाठवून आपल्याला डिलीट केले आहे. अशावेळी व्हॉट्सअॅपवरून मेसेज डिलीट केला जातो. परंतु आपण त्यांना नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन वाचू शकता. या फीचरला काही मर्यादाही आहेत. आपण त्याच्या मदतीने पाठवलेल्या मीडियामध्ये म्हणजेच फोटो, व्हिडिओ किंवा इतर कोणत्याही फाईलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.