WhatsApp मध्ये 5 कमाल फिचर्स, चॅटींगचा आनंद दुप्पट

मेसेजिंगची स्टाईल बदलणार

Updated: Mar 22, 2021, 03:08 PM IST
WhatsApp मध्ये 5 कमाल फिचर्स, चॅटींगचा आनंद दुप्पट title=

मुंबई : साधारण सर्वच मोबाईलधारक आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सऍप वापरतात. अशा सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आणि आनंद देणारी आहे. व्हॉट्सऍप तुमच्यासाठ लवकरच पाच नवीन फीचर्ससह घेऊन येत आहे. या फिचर्सची वैशिष्ट्ये तुमच्या मेसेजिंगची स्टाईल बदलतील आणि वेगळा अनुभव देतील.

व्हॉट्सऍपची नवीन फीचर ट्रॅकिंग साइट वाबेटाइन्फो माहितीनुसार मेसेजिंग ऍप व्हॉईस मेसेजची चाचणी घेत आहे. आता तुमच्यासाठी तीन नवीन व्हॉईस संदेश प्लेबॅक स्पीड तयार केले जात आहेत. आता आपण व्हॉइस नोट्सवर नियंत्रण ठेवू शकाल.

येत्या काही दिवसात वापरकर्त्यांना नवीन डिव्हाइस नियंत्रण पॅनेल मिळणार असल्याचा दावा साइटने केला आहे. डेस्कटॉपमध्ये व्हॉट्सऍप वापरताना आता तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागणार नाही. एकदा लॉग इन झाल्यानंतर आपण डेस्कटॉपवर व्हॉट्सऍप वापरु शकता.

व्हॉट्सऍप तुम्हाला आता मेसेजिंगसह लहान व्हिडिओही दाखवेल. रिपोर्ट्सनुसार व्हॉट्सऍप लवकरच अ‍ॅपमध्ये इन्स्टाग्राम रील्स देखील बाजारात आणण्याची योजना आखत आहे. लवकरच वापरकर्त्यांना हे वैशिष्ट्य मोबाईलमध्ये पाहायला मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सऍपवर 24 तासात हा मेसेज अदृश्य होईल. म्हणजेच आपल्याला पुन्हा पुन्हा चॅटकडे जाऊन मेसेज हटविण्याची आवश्यकता नाही.

काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की व्हॉट्सअॅप तुम्हाला लवकरच डेस्कटॉपवर कॉल करण्याची सुविधा देणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण आता डेस्कटॉपवरूनच ग्रुप कॉल करू शकता.