व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपने अधिकृतपणे इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप बंद केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप बऱ्याच दिवसांपासून याबाबत माहिती देत होते. त्यानंतर आता Desktop App बंद झाल्याची घोषणा करण्याच आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 27, 2023, 05:56 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App title=

WhatsApp Electron-Based Desktop App : मेटाच्या मालकीच्या क्विक मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) विंडोजवरील त्याचे इलेक्ट्रॉन-आधारित डेस्कटॉप अ‍ॅप (Electron-Based Desktop App) अधिकृतपणे बंद केले आहे. कंपनीने नुकतेच त्यांचे इलेक्ट्रॉन आधारित डेस्कटॉप अ‍ॅप बंद करण्याची घोषणा केली आहे. सॉफ्टवेअरची लाईफ संपल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जे विंडोज युजर्स याचा वापर करत होते किंवा जे युजर्स आता इलेक्ट्रॉन व्हर्जनवाले अ‍ॅप सुरु करतील त्यांना डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरणे सुरू ठेवण्यासाठी नवीन अॅपवर स्विच करण्याचा मेसेज दिसत आहे.

डेस्कटॉप डिव्हाइसेसवर अधिक ऑप्टिमाइझ, स्थिर आणि फिचर समृद्ध मेसेजिंग अनुभव मिळण्यासाठी हे बदल केले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही युजर्सनी या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली आहे. नव्या अॅपवर स्विच करण्याचा मेसेज येत असल्याचा तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. त्यामुळे जर आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपवर वापरायचे असेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून विंडोजसाठी मूळ डेस्कटॉप अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपने अचानक बंद केले अ‍ॅप?

मात्र, व्हॉट्सअ‍ॅपने इलेक्ट्रॉन अॅप पूर्णपणे बंद केलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅप चार आठवड्यांहून अधिक काळ अ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर काउंटडाउनद्वारे युजर्सना सतर्क करत होते. मंगळवारी एका घोषणेसह, इलेक्ट्रॉनिक-आधारित व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अॅप, जे डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी एक गो-टू पर्याय म्हणून काम करते होते ते आता अधिकृतपणे बंद करण्यात आले आहे.

Desktop App

इलेक्ट्रॉन-आधारित व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप उघडल्यावर, युजर्सना आता एक एक्सपायरी मेसेज दिसत आहे. या मेसेजमध्ये हे अ‍ॅप यापुढे चालणार नाही आणि युजर्सना Windows डेक्सटॉप WhatsApp वापरण्यासाठी नवीन अ‍ॅपवर स्विच करावे लागेल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र सध्या फक्त Windows व्हर्जनवरच हा नियम लागू झाला आहे. कारण नवीन अॅप गेल्या वर्षीपासून स्थिर आहे.

बंद केलेले अ‍ॅप इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित होते. याने डेवलपर्सना वेब टेक्नोलॉजीचा वापर करुन क्रॉस-प्लॅटफॉर्म डेस्कटॉप अ‍ॅप तयार करण्याची परवानगी दिली होती. याउलट, नेटिव्ह अ‍ॅप एक चांगला युजर इंटरफेस, उत्तम प्रतिसाद आणि चांगली स्थिरता देते. म्हणूनच, व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युजर्ससाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे.

मात्र नवीन विंडोज अ‍ॅपमध्ये काही बिझनेस टूल्सचा अभाव असल्याने काही युजर्सनी जुने अ‍ॅप बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे युजर्सना जलद प्रतिसाद देण्यापासून आणि कॅटलॉग मॅनेजमेंन्टसाठी आवश्यक टूल्स वापरण्यापासून थांबवते.