WhatsApp ग्रुप ऍडमिनला मिळणार 'हे' जबरदस्त अधिकार; खोट्या मॅसेजवर आळा बसणार

WhatsApp latest update: WhatsAppवर ऍडमिनसाठी लवकरच एक नवीन फीचर येणार आहे, ज्यामध्ये ग्रुप ऍडमिनला आणखी काही महत्वपूर्ण अधिकार मिळणार आहेत.

Updated: Feb 2, 2022, 12:57 PM IST
WhatsApp ग्रुप ऍडमिनला मिळणार 'हे' जबरदस्त अधिकार; खोट्या मॅसेजवर आळा बसणार title=

मुंबई : WhatsApp latest update: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp नवीन फीचरवर काम करत आहे. या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवरील ग्रुप ऍडमिनला इतर सदस्यांच्या मॅसेजवर कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे.

WhatsApp ट्रॅकर WABetaInfo नुसार, व्हाट्सअप ग्रुप ऍडमिनला कोणत्याही सदस्याचे मॅसेज डिलीट फॉर ऑल करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यानंतर इतर सदस्यांना "हा मेसेज ऍडमिनने डिलीट केला आहे" असा मेसेज मिळेल.

WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही ग्रुप ऍडमिन असाल तर तुम्ही तुमच्या ग्रुपमधील कोणताही मेसेज सर्वांसाठी  डिलीट करू शकाल. अँड्रॉईड यूजर्सना लवकरच याविषयी अपडेट मिळणार आहे.

ऍडमिनला मिळणार अधिक शक्ती

WhatsApp ट्रॅकरने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, जो अॅडमिनने डिलीट केलेला मेसेज कसा असेल हे दाखवतो. या फीचरच्या आगमनाने ग्रुप अॅडमिनला अधिक अधिकार मिळणार आहे. याद्वारे ग्रुपमध्ये येणाऱ्या आक्षेपार्ह साहित्य आणि अश्लील मजकुरावर अॅडमिन लगाम घालू शकतो.

हे नवीन वैशिष्ट्य 

WhatsApp आपल्या डेस्कटॉप आणि वेब आवृत्त्या अधिक सुरक्षित करण्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन फीचर सुरू करण्यावर विचार करीत आहेत.