मुंबई : आता व्हॉट्सअॅपवर आलेली महत्त्वाचे कागदपत्रे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही किंना त्याला जास्त शोधावं लागणार नाही. कारण व्हॉट्सअॅपवर आता अशी सुविधा उपलब्ध आहे की, तुम्ही चॅटिंग दरम्यान तुमचा डीपी सेव्ह करु शकता, त्याच बरोबर तुम्ही तुमची आवश्यक माहिती देखील वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला सारखा व्हॉट्सअॅप स्क्रोल करावा देखील लागणार नाही.
आधी तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल, ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्यातरी मित्राला पाठवायला लागायचा किंवा एखादा डॉक्यूमेंट तुमच्या कंप्यूटरमध्ये असल्यास तुम्ही त्यात व्हॉट्सअॅपवर ओपन करुन आपल्या कोणत्यातरी मित्राला पाठवतो आणि मग ते आपण आपल्या फोनमध्ये सेव्ह करतो.
अशी सगळी मेहनत आपल्याला दरवेळी घ्यावी लागते. परंतु आता तुम्ही एकदा मेहनत घेऊन कोणा दुसऱ्याला डॉक्यूमेंट न पाठवता स्वत:लाच सगळे डॉक्यूमेंट्स पाठवून सेव्ह करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो करावे लागतील.
-यानंतर, अॅड्रेस बारमध्ये wa.me// टाइप करा, नंतर तुम्हाला तुमच्या देशाचा कोड प्रविष्ट करावा लागेल, भारताचा कोड 91 आहे. त्यापुढे आपला मोबाइल नंबर टाइप करा.
-यानंतर, आपल्या ब्राउझरमध्ये wa.me//91xxxxxxxxxx (x म्हणजे तुमचे मोबाईल नंबर) टाका आणि Enter करा किंवा Search करा.
-यानंतर, ब्राउझरमध्ये डाउनलोड किंवा व्हॉट्सअॅप वेब लिहिलेले आढळेल. व्हॉट्सअॅपवर क्लिक केल्यानंतर आपणास स्वतःची चॅटिंग स्क्रीनवर उघडेल.
-यानंतर Hi टाईप करून मेसेज पाठवा.
-आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये उपस्थित असलेले व्हॉट्सअॅप उघडाल, तेव्हा त्यात तुम्हाला स्वतःचे चॅटिंग दिसेल.
- तुम्ही तुमच्या कोणत्याही Contact सह एक ग्रुप तयार करा आणि त्यानंतर ते Contact हटवा
-यामुळे, केवळ तुम्हीच त्या ग्रुपमध्ये राहाल, ज्यामुळे तुम्हा हा ग्रुप फक्त तुमच्या वापरासाठी वापरू शकता.
-तुमचं गुप चॅट दुसरे मॅसेज येत असल्याने सतत खाली जाणार, हे टाळण्यासाठी तुम्ही त्या ग्रुपला पिन करू शकता.
-यामुळे तुमचे चॅटिंग तुम्हाला सगळ्यात सुरवातीला दिसून येईल