WhatsAppने ऑगस्टमध्ये 20 लाख भारतीयांचे अकाउंट केले बंद; या कारणामुळे केली कारवाई

ऑनलाईन मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपने 20 लाखाहून अधिक भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. 

Updated: Oct 2, 2021, 11:55 AM IST
WhatsAppने ऑगस्टमध्ये 20 लाख भारतीयांचे अकाउंट केले बंद; या कारणामुळे केली कारवाई title=

मुंबई : ऑनलाईन मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपने 20 लाखाहून अधिक भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. कंपनीला ऑगस्टमध्ये 420 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंबधी मिळालेल्या रिपोर्टनुसार कंपनीने ही कारवाई केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार व्हाट्सअप अनुपालनांनी रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. तसेच मीडिया कंपनी फेसबुकने ऑगस्ट महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3.17 कोटी सोर्सेवर कारवाई केली आहे.

बल्क मॅसेजचा चुकीचा वापर
व्हाट्सअपने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, ऑगस्ट महिन्यात 20 लाख 70 हजार भारतीयांचे अकाउंट बंद करण्यात आले आहेत. व्हाट्सअपने याआधी म्हटले की, ज्या अकाउंटवर बंद घालण्यात आली आहे ते 95 टक्के अकाउंट बल्क मॅसेजचा चुकीचा वापर करीत होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही बंदी
आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हाट्सअप प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर करणाऱ्या साधारण 80 लाख अकाउंटवर दर महिन्याला कारवाई करण्यात येते. फेसबुकने शुक्रवारी जारी केलेल्या आपल्या अनुपालन रिपोर्टमध्ये म्हटले की, ऑगस्ट 2021 मध्ये 3.17 कोटी कंटेटवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इंस्टाग्रामवरील नऊ वेगवेगळ्या कॅटेगरीमधील 22 लाख कंटेंटवर कारवाई करण्यात आली आहे.