मुंबई : सध्या पेट्रोल आणि डिजेलची किंमत गगनाला भिडली आहे. ज्यामुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ज्यामुळे लोकं आता इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कार घेण्याचा विचार करत आहेत, त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेली आग. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची खूपच चर्चा सुरू आहे.
स्मार्टफोनची बॅटरी फुटल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण असेच एक प्रकरण समोर आले आहे; ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. परंतु या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इलेक्ट्रिक स्कूटीमधून धूर निघल्यानंतर त्याला भीषण आग लागली आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, पार्क केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमधून अचानक धूर निघू लागतो. बराच काळ धूर आल्यानंतर गाडीला आग लागली. आगीचा लोळ पाहून लोकांनी सैरावैरा पळण्यासाठी सुरूवात केली.
इलेक्ट्रिक स्कूटरला आग कशी लागली? याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्कूटरची विक्री रोखण्यासाठी किंवा नाव खराब करण्यासाठी इलेक्ट्रिक सर्किट किंवा स्कूटरच्या बॅटरी युनिटमध्ये छेडछाड केली असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेवर आपण आताच प्रश्नचिन्ह उभे करु शकत नाही.
Buy a E Scooter and suffer pic.twitter.com/OGX6CxMmMb
— Patrao (@in_patrao) September 29, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांना घाबरवत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी फुटल्यास ती जीवघेणी ठरू शकते. हा व्हिडीओ ट्विटरवर @in_patrao ने शेअर केला आहे.
या कंपनीने IIT हैदराबादमध्ये दोन वर्षांपूर्वीचे स्टार्टअप सुरू केलं आहे आणि गेल्या 18 महिन्यांत 25 हजार इलेक्ट्रिक वाहने विकल्याचा दावा केला आहे. वर्षानुवर्षे देशभरातील अनेक इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केले आहेत. अनेक लोक इलेक्ट्रिक वाहने घेण्यात रस दाखवत आहे.