WhatsApp ची 20 लाखांपेक्षा अधिक भारतीय अकाउंटवर बंदी, जाणून घ्या या मागील कारण

एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवेतील गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वात आघाडीवर आहे.

Updated: Dec 2, 2021, 08:11 PM IST
WhatsApp ची 20 लाखांपेक्षा अधिक भारतीय अकाउंटवर बंदी, जाणून घ्या या मागील कारण title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे फेसबुकच्या सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍपपैकी एक आहे. व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता इतकी आहे की, भारतच काय तर संपूर्ण देशात याचे युजर्स आहेत. त्यामुळे आपले प्लॅटफॉर्म वापरताना लोकांना कंटाळा येऊ नये किंवा आपले युजर्स दुसऱ्या कोणत्याही पर्ययांकडे वळू नये यासाठी कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देत असते. तसेच ग्राहकांच्या प्रायवेसीची देखील काळजी करत असते. असेअनेक लोकं आहेत की, ते या अ‍ॅपचा चुकीचा फायदा घेतात. परंतु कंपनी यासगळ्यावरती लक्ष ठेऊन आहे.

आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपने या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणाऱ्या 20 लाखांहून अधिक खात्यांवर कारवाई केली आहे.

कंपनीने ऑक्टोबरच्या अहवालात म्हटले आहे की, त्यांना ऑक्टोबर महिन्यात 500 तक्रार अहवाल मिळावेत. ताज्या अहवालानुसार, या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅपने 2,069,000 भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे.

WhatsApp  91 ने सुरू होणाऱ्या फोन नंबरला भारतीय अकाउंट असल्याचे मानतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवेतील गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वात आघाडीवर आहे.

यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. याशिवाय, कंपनी डेटा वैज्ञानिक आणि तज्ञांवर देखील गुंतवणूक करते जेणेकरून या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ते सुरक्षित राहतील.

WhatsApp चे प्रवक्ते पुढे म्हणाले की, IT नियम 2021 अंतर्गत कंपनीने पाचव्यांदा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. हा अहवाल ऑक्टोबर महिन्याचा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी म्हटले होते की, 95 टक्के बंदी स्वयंचलित किंवा बॉल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरासाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅपने जागतिक सरासरी दरमहा 8 दशलक्षाहून अधिक खाती बंद केली आहेत.

सप्टेंबरमध्येही व्हॉट्सअ‍ॅपने 20 लाखांहून अधिक खाती बंद केली होती. यादरम्यान 560 तक्रार अहवाल प्राप्त झाले. नवीन IT नियमानुसार, 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला आपला अहवाल जारी करावा लागतो.