मुंबई : जे लोक टाटा मोटर्सची अपकमिंग एसयूवी नेक्सॉन कारची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर आहे.
टाटा आपली SUV-Naxon ही कार या महिन्यात लाँच करणार असून याचं प्री बुकिंग तुम्ही ११ सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून करू शकता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतातून कुठूनही तुम्ही याचं बुकिंग करू शकता आणि ते देखील अवघ्या ११ हजारात.
ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स ज्या दिवसांमध्ये आपली ही कार लाँच करत आहेत. त्या दिवसांमध्ये मारूती सुझुकीची विटारा ब्रेझा आणि फोर्डची इको स्पोर्ट कार देखील चांगला बिझनेस करत आहे. त्यामुळे निक्सॉनसोबत या कार कॉम्पिटीशन करणार आहेत. अद्याप या कारची किंमत कुठेही सांगण्यात आलेली नाही. मात्र अशी चर्चा आहे की एसयूवी नेक्सनची किंमत ही ६.५ लाखापासून ते ९.५ लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे.
टाटाने सांगितलं आहे की, नवी नेक्सॉन एसयूवीमध्ये १.५ लीटरचे रेवेट्रॉन इंजिन देण्यात आलं आहे. सोबतच कंपनीने एप्पल कार प्ले आणि एंड्रॉइड ऑटो सारखे अॅडवान्स फिचर्स देखील दिली आहे. नेक्सॉनच्या डॅशबोर्डवर टाटाने टचस्क्रीन आणि फ्री स्टँडिंग एचडी इन्फोटेमेंट स्क्रीन लावली आहे.