आता Voter Id थेट तुमच्या घरी पोहोचेल; आजचं फॉलो करा सोप्पी प्रोसेस

 Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. ते बनविण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा सरकारी कार्यालयात फेऱ्या मारव्या लागतात. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, 

Updated: Aug 28, 2022, 12:23 PM IST
आता Voter Id थेट तुमच्या घरी पोहोचेल; आजचं फॉलो करा सोप्पी प्रोसेस  title=

Voter ID Online :  Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. ते बनविण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा सरकारी कार्यालयात फेऱ्या मारव्या लागतात. अनेक वेळा तुमच्याकडे कागदपत्रे पूर्ण नसतात. अशात तुम्हाला त्रास देखील सहन करावा लागतो. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, असाही एक मार्ग आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला रांगेत उभे राहण्याची चिंता करावी लागणार नाही आणि तुम्हाला मतदार ओळखपत्र देखील घरपोच मिळेल. जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस. 

याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करता येईल

Election Commission च्या वेबसाइटचा वापर करून तुम्ही काही सोप्या पध्दतीने घरी बसून मतदार ओळखपत्र मिळवू शकता. ते तुम्हाला फक्त 10 दिवसांत मिळेल, चला तर मग जाणून घेऊया त्याची प्रक्रिया काय आहे.

फॉलो करा ही प्रोसेस 

- सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या (Election Commission ) वेबसाइटवर जावे लागेल.
- आता होमपेजवर नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टलवर क्लिक करा.
- त्यानंतर Apply Online विभागात नवीन मतदार नोंदणीवर क्लिक करा.
- येथे फॉर्म-6 डाउनलोड करा आणि त्यात माहिती भरा नंतर सबमिटवर क्लिक करा.
- आता तुमच्या ई-मेल आयडीवर एक लिंक येईल.
- या लिंकद्वारे तुम्ही मतदार ओळखपत्र अर्जाची स्थिती सहजपणे ट्रॅक करू शकाल.
- आता तुमचा मतदार ओळखपत्र आठवडाभरात तुमच्या घरी पाठवला जाईल.