नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे.
या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा देण्यात आला आहे. तसेच रिलायन्स जिओच्या ९१ जीबी प्रीपेड प्लान लॉन्च केल्यानंतर काही दिवसातच या प्लानला महाग करण्यात आले. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी व्होडाफोनने हा प्लान बाजारात उतरविला आहे.
६९ रुपये प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल (कोणत्याही नेटवर्कवर) देण्यात येणार आहे. तसेच २५० एमबी डेटा देण्यात येणार आहे. याची वैधता सात दिवस असणार आहे.
८९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला व्होडाफोनहून दुसऱ्या नेटवर्कवर बोलण्यासाठी १०० मिनिटे देण्यात येणार आहे. त्याचीही वैधता ७ दिवस असणार आहे.
५२ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमीटेड लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉल्ससह ४ जी आणि ३ जी डाटा देण्यात येणार आहे. त्याचीही वैधता ७ दिवस असणार आहे.
८७ रुपयांचा प्लानमध्ये अनलिमिटेड व्होडाफोन टू व्होडाफोन कॉल्स देण्यात येणार आहेत तर इतर नेटवर्कला कॉल करण्यासाठी १० मिनिटे देण्यात येणार आहे.त्याचीही वैधता ७ दिवस असणार आहे.
जिओने काही दिवसांपूर्वी ९१ जीबीचा प्रीपेड प्लान सादर केला होता. आता त्याची किंमत वाढविण्यात आली आहे. या प्लानची किंमत ४५० रुपये होती आता त्या किंमत वाढवून ४९९ रुपये करण्यात आली.