सॅमसंगच्या 'या' मोबाईलवर वोडाफोनची कॅशबॅक ऑफर

वोडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याची घोषणा केली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 4, 2018, 04:00 PM IST
सॅमसंगच्या 'या' मोबाईलवर वोडाफोनची कॅशबॅक ऑफर title=

मुंबई : वोडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने ४जी स्मार्टफोनवर शानदार कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो, गॅलेक्सी जे७ किंवा गॅलक्सी जे७ मॅक्स या फोन्सवर वोडाफोन कॅशबॅक देणार आहे.

या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास...

सॅमसंग गॅलक्सी जे२ प्रो, गॅलक्सी जे७ नेक्स्ट किंवा गॅलक्सी जे७ मॅक्स खरेदी केला असल्यास २४ महिने सातत्याने १९८ रूपयांचा रिचार्ज करा. यात तुम्हाला २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. त्याचबरोबर पोस्टपेड युजर्संना वोडाफोनचा रेड प्लॅन घ्यावा लागेल. यात १२ महिन्यांनंतर ६०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि नंतर २४ महिन्यानंतर ९०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे एकूण १५०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक वोडाफोनच्या एम पैसा वॉलेटमध्ये येईल.

ऑफरमुळे किंमत कमी

सॅमसंग गॅलक्सी जे२ प्रो ची किंमत ८,४९० रुपये आहे. या ऑफरमध्ये ही किंमत ६,९९० रुपये असेल. त्यातच सॅमसंग गॅलक्सी जे७ नेक्स्ट आणि सॅमसंग गॅलक्सी जे७ मॅक्स ची किंमत अनुक्रमे १०,४९० रुपये आणि १६,९०० रुपये आहे. मात्र कॅशबॅकमुळे ही किंमत अनुक्रमे ८,९९० रुपये आणि १५,४०० रुपये होईल.