Vodafone आता 'या' प्लानमध्ये देतयं दररोज १.५ जीबी डेटा

वोडाफोनने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 12, 2017, 04:24 PM IST
Vodafone आता 'या' प्लानमध्ये देतयं दररोज १.५ जीबी डेटा title=

नवी दिल्ली : वोडाफोनने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

वोडाफोनने आपल्या एका प्लानमध्ये बदल केला असून त्यामध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटा मिळणार आहे. यापूर्वी या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ १ जीबी डेटा मिळत होता.

वोडाफोनच्या ऑफरमध्ये ग्राहकांना आता ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड (लोकल+STD) वॉईस कॉल, फ्री अनलिमिटेड नॅशनल रोमिग आणि वोडाफोन प्ले सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

मात्र, या प्लानमध्ये SMS ची कुठलीही ऑफर देण्यात आलेली नाहीये. त्यासोबतच वॉईस कॉल्समध्ये प्रतिदिन २५० मिनिटांचं लिमिट आणि प्रति आठवडा १००० मिनिट मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असणार आहे.

काही दिवसांपूर्वी वोडाफोनने या प्लानमध्ये अनलिमिटेड रोमिंंग, आऊटगोइंग कॉलची ऑफर दिली होती. मात्र, आता डेटामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल सध्या मुंबई आणि गुजरातमध्ये करण्यात आला आहे.

इतर सर्कलमधील ग्राहक या प्लानसाठी कंपनीसोबत संपर्क करु शकतात. तसेच सर्कलनुसार प्लानच्या किंमतीमध्ये अंतर आहे.

वोडाफोनच्या आधी रिलायन्स जिओशी असलेल्या टक्करमुळे एअरटेलने आपल्या ३४९ रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. या प्लानमध्ये पूर्वी प्रतिदिन केवळ १ जीबी डेटा दिला जात होता तर आता या प्लानमध्ये अपडेट करुन १.५ जीबी डेटा दिला जात आहे.