मुंबई : विवो नवीन सिरीजचे तीन स्मार्टफोन 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी लॉंच करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनीचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 प्रो आणि Vivo X70 प्रो+ असणार आहे. अधिकृतरित्या लॉंच होण्या आधी कंपनीच्या या स्मार्टफोन्सचे काही डिटेल्स आणि लुक रिविल झाले आहेत. X70 प्रो + चे फोटोदेखील समोर आले आहेत.
Vivo X70
या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसरसोबत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनला Exynos 1080 प्रोसेसर असणार आहे. या फोनसाठी 6.56 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिझॉल्युशन 1080 p असू शकते. स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप असणार आहे. ज्यामध्ये 40 MP चा प्रायमरी कॅमेरा, 12 MP आणि 13 MP कॅमेरा सेटअप असणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4400mAh असू शकते. ज्यामध्ये 44 W फास्ट चार्चिंगची सुविधा मिळतेय.
Vivo X70 आणि Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स मिळते जुळते आहेत.
Vivo X70 PRO +
या सिरिजमधील हा उत्तम फीचर्सचा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये डिस्प्ले 6.78 इंच असू शकतो. तर 2 K रिझॉल्युशन आणि 120 हर्ट्स रिफ्रेश रेट असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लसचे प्रोसेसर वापरले जाणार आहे. बॅटरी 4500mAh ची बॅटरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 50 Wची फास्ट वायरलेस चार्जिंगआणि 55 W चा फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट असू शकतो. 50 MPचा सॅमसंगचा GN1 सेंसर, 12 MP चा कॅमेरा, 48 MPचा IMX598 सेंसर आणि 8 MP चा पेरिस्कोप कॅमेरा असणार आहे.