Vivo T2 5G Smartphone Launch : गेल्या अनेक दिवसांपासून Vivo T2 मालिकेशी संबंधित बातम्या येत आहेत. मात्र आता विवोने आपला नवीन मोबाईल फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध केला आहे. यामध्ये फोन Vivo T2 5G भारतात लॉन्च केला असून कंपनीने या फोनची फ्लिपकार्टच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. या फोनमध्ये कमी पैसात जास्त स्पेसिफिकेशन पाहायला मिळत आहे.
Vivo T2 5G चे दोन्ही प्रकार भारतात आले आहेत. एकामध्ये 6GB RAM आहे आणि दुसर्यामध्ये 8GB RAM आहे. परंतु दोन्ही मॉडेलमध्ये 128GB स्टोरेज आहे. बेस मॉडेलची किंमत 18,999 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. या फोनची विक्री 18 एप्रिलपासून फ्लिपकार्ट तसेच विवोची वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरद्वारे केली जाईल. Vivo T2 5G व्हेलॉसिटी वेव्ह आणि नायट्रो ब्लेझ रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
वाचा : कोण जिंकणार आजचा सामना? चेन्नई सुपरकिंग्स की राजस्थान रॉयल्स, पाहा Playing 11
Vivo T2 5G या स्मार्टफोनला 6.38 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईलची स्क्रीन AMOLED पॅनेल असून पूर्ण HD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करते. Vivo T2 5G स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे देण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये Android 13 cum Funtouch OS देण्यात आले आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Vivo T2 5G फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलला LED फ्लॅशसह 64-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला असून जो F 1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. नवीन जोडणीमध्ये एफ 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 16MP सेंसर आहे.
Vivo T2 5G पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, 2G, 3G, 4G, 5G तसेच Wi-Fi, Bluetooth, USB, GPS आणि OTG सपोर्ट देखील उपलब्ध आहेत. हा मोबाईल ड्युअल सिम फोन असून जो मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.