व्हॅलेंटाईन डे : 'पबजी' खेळता खेळताच ते प्रेमात पडले आणि...

व्हॅलेंटाईन वीकमध्ये नुरहानचं हे ट्विट खूपच कमी वेळात व्हायरल झालंय

Updated: Feb 14, 2019, 04:32 PM IST
व्हॅलेंटाईन डे : 'पबजी' खेळता खेळताच ते प्रेमात पडले आणि... title=

नवी दिल्ली : सध्या ज्या ज्यानं तरुणाईला वेड लावलंय तो वादग्रस्त पबजी गेम तर तुम्हाला एव्हाना माहीत झालाच असेल... याच पबजी गेममुळे एक जोडपं विवाहबंधनात अडकलंय. हो... हे खरं आहे. एकीकडे हा गेम लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी धोकादायक असल्याचं सांगत अनेक राज्य या डिजिटल गेमवर बंदी आणण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे या गेमची लोकप्रियता पाहता या गेमची निर्माता आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचं आयोजन करत करोडो रुपयांचं बक्षीस जाहीर करत आहेत. पण, या सर्व चर्चांना बाजुला सारत हा गेम खेळता खेळता एक तरुण आणि एक तरुणी चक्क प्रेमात पडले. 

Player Unknown's Battlegrounds अर्थात पबजी नावाचा हा गेम खेळता खेळता या दोघांची ओळख झाली आणि आता या दोघांनी एकमेकांशी साखरपुडाही उरकून घेतलाय. 


पबजी जोडपं

नूरहान-अल-हशीश नावाच्या व्यक्तीनं आपल्या  @Nourhanlhashish या ट्विटर अकाऊंटवर आपली ही प्रेमाची अनोखी कहाणीच सांगितलीय.'पबजीपासून सुरुवात झाली आणि आम्ही साखरपुडा केला' असं म्हणत त्यानं आपल्या मैत्रिणीसोबत ७ फेब्रुवारी रोजी आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्यात. नूरहान यानं आपल्या मैत्रिणीचं नाव मात्र आपल्या पोस्टमध्ये सांगितलेलं नाही. 

व्हॅलेंटाईन वीकमध्ये नुरहानचं हे ट्विट खूपच कमी वेळात व्हायरल झालंय. नुरहान हा इजिप्तचा रहिवासी आहे.