नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी गुगल प्ले स्टोअरवरून यूसी ब्राऊजर हटवण्यात आले होते. कारण त्यातून काही डेटा चोरीला जात असल्याची चर्चा होती. मात्र कंपनीने हे आरोप धुडकावून लावले होते. युसी ब्राऊजरचे नवीन व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचे कंपनीने सांगितले.
अलीबाबा मोबाईल बिजनेस ग्रुपच्या आंतराष्ट्रीय व्यापार विभागाचे प्रमुख योग ली यांनी सांगितले की, "प्ले स्टोरवर यूसी ब्राऊजरच्या सेटिंग तपासली जाईल. या अॅपचे मिनी व्हर्जन बनवून फ्री अॅप सेक्शन मध्ये टॉपला आहे."
युसी ब्राऊजरचे ४५% युजर्स असून भारतात मोबाईलच्या माध्यमातून त्याचा अधिक वापर केला जातो. त्यानंतर गुगल क्रोमचा नंबर आहे. गुगल प्ले स्टोअरवरून युसी ब्राऊजर ५० कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे.