भूक काय करायला लावते पाहा, तरुणींनी हेअर नुडल्स खायलाही कमी केलं नाही

प्रसिद्धीसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही.

Updated: Apr 11, 2022, 09:53 PM IST
भूक काय करायला लावते पाहा, तरुणींनी हेअर नुडल्स खायलाही कमी केलं नाही title=

मुंबई : प्रसिद्धीसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. आपल्याला लोकांनी पाहावं, झटपट प्रसिद्ध होता यावं आणि त्या माध्यामातून उत्तपन्न मिळावं, या हेतूने हल्ली अनेक जण उलटसुलट व्हीडिओ तयार करुन हवा करत असता. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एका व्यक्तीने चक्क नूडल्सने हेअरस्टाईल केली आहे. (unique noodles hair style watch viral video)

या व्हीडिओत हेअरस्टाईलिशने तरुणाच्या डोक्यावर नूडल्सद्वारे हटके हेअरस्टाईल साकारली आहे. त्यानंतर दोन तरुणी हे नूडल्सरुपी केस खाण्यासाठी पुढे येताना दिसतात.

या विचित्र पण हटके व्हीडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच आतापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हीडिओला मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BMR Twins (@bmrtwins1)