WhatsApp युजर्स सावधान! 'या' चुका कधीही करु नका नाहितर तुमचं खातं बॅन होऊ शकतं

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते बॅन होऊ शकतं.

Updated: Apr 10, 2022, 08:12 PM IST
WhatsApp युजर्स सावधान! 'या' चुका कधीही करु नका नाहितर तुमचं खातं बॅन होऊ शकतं title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया  मेसेजिंग अ‍ॅपपैकी एक आहे. बहुतेक आपल्या सगळ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पाहायला मिळतो. कोणाला फोन, व्हिडीओकॉल, फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वात सोईचा पर्याय आहे. ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वांच्याच जीवनीचा एक भाग आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ऑफिस, विद्यार्थी आणि व्यवसायासाठी केला जातो. पण या अ‍ॅपमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहीत नाहीत.

या अ‍ॅपबद्दल आनखी अशा गोष्टी आहेत. जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. त्यामुळे तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅपवर एखादी चुक केलात, तर त्यामुळे तुमचं खातं बॅन होऊ शकतं, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरताना काळजी घ्या.

तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते बॅन होऊ शकते.

'व्हॉट्सअ‍ॅप वापरून मोठ्या प्रमाणात मेसेज करू नका, ऑटो-मेसेज करू नका किंवा ऑटो-डायल करू नका' असे सांगून व्हॉट्सअ‍ॅप याविरुद्ध स्पष्टपणे चेतावणी देते. त्यामुळे कोणालाही मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवू नका.

बल्क संदेश हा रेड सिग्नल आहे. जे लोक बल्कमध्ये संदेश पाठवतात, परंतु असे बल्कमध्ये पाठवले जाणारे संदेश फसवणूक करणारे किंवा घोटाळ्या संबंधीत असल्याचे सूचीत होते. त्यात जर एखाद्या खातेदाराने त्याची तक्रार केली, तर असे खाते बॅन केले जाईल.

लोकांनी तुमची अनेक वेळा तक्रार केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बॅन केले जाऊ शकते. तुम्ही WhatsApp वर कोणाशी कसा संवाद साधता याची काळजी घ्या.

लक्षात ठेवा की ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मेसेज फक्त तेव्हाच मिळतील जेव्हा वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जोडला असेल आणि ब्रॉडकास्ट मेसेजचा वारंवार वापर केल्यामुळे तुमच्या मेसेजची तक्रार लोक करू शकतात ज्यामुळे तुमच्या WhatsApp खात्यावर बंदी घातली जाऊ शकते.

तसेच तुम्ही मॅन्युअल टूल्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर WhatsApp वरून माहिती काढणे टाळले पाहिजे. जसे की, WhatsApp वरून फोन नंबर, डीपी आणि कॉन्टॅक्टची यांची माहिती मिळवणे हे कंपनीच्या सेवा अटींचे उल्लंघन करते. असं केल्यामुळे तुमचं खातं ब्लॉक देखील होऊ शकतं.