उबेर आणणार उडणारी टॅक्सी, NASA सोबत करार

 तुम्ही उडणाऱ्या टॅक्सीतून प्रवास केलात तरी तुम्हाला जास्त किंमत मोजण्याची गरज नाही. 

Updated: May 9, 2018, 12:49 PM IST
उबेर आणणार उडणारी टॅक्सी, NASA सोबत करार title=
नवी दिल्ली : उडणाऱ्या टॅक्सीबद्दल आजपर्यंत तुम्ही ऐकल असेल किंवा कोणत्या तरी सिनेमात पाहिल असेल. पण हे आता सत्यात उतरणार आहे. अॅपवरून टॅक्सी बुक करणारी उबर कंपनी या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. त्यांनी अमेरिकेतील प्रमुख अंतराळ संघटना नासा सोबत हातमिळवणी केली आहे. या उडणाऱ्या टॅक्सींचे दरही सामान्य टॅक्सींच्या दरांइतकेच ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही उडणाऱ्या टॅक्सीतून प्रवास केलात तरी तुम्हाला जास्त किंमत मोजण्याची गरज नाही. 

नासासोबत करार 

उबरने अंतराळ कायद्याअंतर्गत नासासोबत दुसरा करार केलाय. यामध्ये शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल तयार केले जाणार आहे. उबरने याबाबतीत सरकारी यंत्रणेसोबतही काम केलंय.

उबरची घोषणा 

'उबर एअर' पायलट योजनेत लॉस एंजलसदेखील भागीदार असणार आहे. याआधी डलास फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत. २०२० पर्यंत अमेरिकेतील काही शहरांत उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे. 

काय म्हणते 'नासा' ?

या कराराला घेवून नासा उत्साही असल्याचे नासाचे असोशिएट अॅडमिनिस्ट्रेटर जयवॉन शिन यांनी सांगितले. शहरी भागात हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर काम केल जात असल्याचेही ते म्हणाले. स्मार्टफोन आल्यानंतर जसा लोकांच्या राहणीमानात बदल झाला त्याप्रमाणे मोठा बदल होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली आहे.