या कंपन्या देताहेत रोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या किंमत

अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवशी १०० एसएमएस फ्री देत आहे. 

Updated: May 9, 2018, 10:23 AM IST
या कंपन्या देताहेत रोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या किंमत title=

मुंबई : टेलिकॉम सेक्टर जियो, वोडाफोन आणि एअरटेलमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आता बीएसएनएलदेखील सहभागी झाला आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवनव्या ऑफर्स आणत आहेत. पहिल्यांदा या कंपन्या ग्राहकांना दिवसाला एक जीबी डेटा देत होत्या. आता दिवसाला ३ जीबी डेटा ऑफर करत आहेत. रिलायन्स जियोने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २९९ रुपयांचा प्लान आणलाय. या प्लानप्रमाणे कंपनी २८ दिवसांकरीता ३ जीबी डेटा देत आहे. यामध्ये युजर्स दरदिवशी ३ जीबी डेटा वापरू शकतात. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवशी १०० एसएमएस फ्री देत आहे.

जियोचा प्लान 

जियोच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने ३४९ रुपयांचा प्लान आणलाय. यानुसार रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असणार आहे. यामध्ये फ्री कॉल आणि रोमिंग कॉलची सुविधाही असणार आहे.

एअरटेल 

एअरटेलनेही युजर्ससाठी रोज ३ जीबीचा डेटा प्लान आणलाय. हा प्लान ३४९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी ३ जी आणि ४ जी डेटा मिळतोय. यासोबतच १०० लोकल आणि एसटीडी एसएमएसही मिळत आहेत.

आयडीया 

आयडीया कंपनीही यामध्ये कुठे मागे राहिली नाही..कंपनीने ३४९ रुपयांचा प्लान आणलाय. यामध्ये रोज ३ जीबी डेटा
आणि २५९ मिनिट आणि आठवड्याला १००० मिनिट फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १०० युनिक नंबरवर १ पैसे प्रति सेकंद दराने कॉल मिळत आहे.