Uber charges Rs 1525 from 21 kms: ऑनलाइन टॅक्सी बूक करुन देणारे मोबाईल अॅप्लिकेशन ही हल्ली फार सामान्य बाब झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये तर ही अॅप दैनंदिन वापराचा भाग झाले आहेत. सामान्यपुणे अशा कॅबने प्रवास करताना अंदाजित रक्कम सांगितली जाते. अनेकदा ही रक्कम वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिकच असते. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला. येथील एका महिला प्रवाशाने उबरवरुन (Uber) टॅक्सी बुक केली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते चित्तरंजन पार्क प्रवासासाठी या महिलेने ही कॅब बूक केली. कॅब चालकाने अवघ्या 21 किमीच्या अंतरासाठी तब्बल 1525 रुपये या महिला प्रवाशाकडून घेतले. म्हणजेच एका किलोमीटरसाठी या महिलेकडून तब्बल 72 रुपये घेण्यात आले. महिलेने कंपनीकडे याविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तिला समोरुन मिळालेली वागणूक ही अधिकच धक्कादायक होती.
या महिलेला आलेलं वाढीव बिल हे जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीममध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक कारणांमुळे आलं आहे, असं उबेरच्या प्रतिनिधिंनी या महिलेला सांगितल्याचं वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे. महिलेकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्कापैकी 900 रुपये परत करण्याची ऑफर त्यांना देण्यात आली. हे पैसे महिलेच्या उबर वॉलेटमध्ये उबर कॅश स्वरुपात जमा करण्यात आल्या. म्हणजे भविष्यातही या महिलेला हे पैसे वापरायचे झाल्याचे उबरच्याच सेवेची निवड करावी लागेल. या महिलेला थेट रिफंड देण्यात आला असता तर तिचे 900 रुपये थेट तिच्या बँक खात्यात जमा झाले असते.
कंपनीने बिलबद्दलची माहिती गोळा केली असता बिलमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याच्या फिचा सामवेश होता. म्हणजेच नवी दिल्लीमधून उत्तर प्रदेशमध्ये गेल्याचे अधिक पैसे आकारण्यात आलेले. मात्र या महिलेने राज्यांची सीमा ओलांडलीच नव्हती. या महिलेले निवडलेलं गंतव्य स्थान हे शहरामध्येच होते. बिलामध्ये महानगरातील टॅक्सचाही एकदा सोडून दोनदा समावेश करण्यात आळा होता. विशेष म्हणजे हा टॅक्स केवळ त्या वाहनांवर लागू केला जातो जी इतर राज्यांमधून दिल्ली शहरात येतात. इथे तो ही प्रकार घडला नव्हता.
या घटनेसंदर्भात बोलताना उबरच्या प्रतिनिधिंनी, "ही घटना जीपीएसमधील गोंधळामुळे झाली. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बील मोजण्यात आलं. उबरने या प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर तातडीने ग्राहकांना पैसे करत केले जातात," असं सांगितलं. अशाप्रकारे ग्राहकांनी जास्त बिलाची तक्रार करण्याची ही काही पहिली घटना नाही. अनेकदा अशा कंपन्यांबद्दल अधिक पैसे आकारण्यात आल्याची तक्रार ग्राहक करतात. हल्ली या अॅपवरुन टॅक्सीचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने असा अतिरिक्त बिलांसंदर्भातील तक्रारींमध्येही मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं.