Dark Web Explained Child Trafficking: आपल्या आयुष्यात आज इंटरनेट हे जीवनवाश्यक गोष्टींपैकी एक झालं आहे, असं म्हणं वावगं ठरणार नाही. इंटरनेट आणि ब्राउझरचे अनेक फायदे आहेत आणि आजची तरुण मंडळींपासून मोठ्यापर्यंत अगदी सगळेच या इंटनेटच्या युगात जगतात. जिथे इंटरनेटचे सर्व फायदे आहेत, तिथे त्याचे अनेक तोटे आणि घृणास्पद बाजूही आहे. इंटरनेटचा असाच एक घृणास्पद चेहरा म्हणजे डार्क वेब (Dark Web). डार्क वेब हा इंटरनेट आणि ब्राउझिंगचा एक भाग आहे जिथे मुलांची तस्करी (Child Trafficking) होते आणि प्रत्येक मुलाकडून 1.5 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत डार्क वेब काय आहे (What is Dark Web) आणि इथे मुलांची तस्करी कशा प्रकारे (Child Trafficking on Dark Web) केली जाते याविषयी.
डार्क वेब म्हणजे हा एक ब्राउझर आहे जिथे समाजाची काळी कृत्ये केली जातात. या वेबवर शस्त्रे आणि ड्रग्जचं जाळं तर आहेत शिवाय इथे लहान मुलांचीही तस्करी केली जाते, अशी माहिती समोर आली आहे.गुगल डार्क वेबवर काम करते, इथे पासवर्डऐवजी 'एनक्रिप्टेड कोड' वापरला जातो. (treading news what is dark web child trafficking sexual exploitation)
डार्क वेबवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या एकत्रितपणे 'Alphabay' म्हणून ओळखल्या जातात. 'ब्लॅक डेथ ग्रुप' आणि 'चाइल्ड्स प्ले' सारखे गट लहान मुलींना एक प्राइस टॅग देतात आणि त्यांना डार्क वेबद्वारे विकतात. इंटरपोलने अल्फाबे बंद केले आहे परंतु यासारख्या इतर अनेक वेबसाइट्स आहेत जिथे मुलांची तस्करी सुरू आहे, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वर्षात डार्क वेबवर मानवी तस्करीच्या माध्यमातून सुमारे 12 लाख कोटी रुपये कमावले गेल्याचा मोठा खुलासा झाला आहे.
युरोपॉल या युरोपीय संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी दोन लाखांहून अधिक मुलांचं लैंगिक शोषण होतं आणि प्रत्येक मुलामागे सुमारे दीड कोटी रुपये कमावले जातात. भयानक म्हणजे लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं लाईव्ह स्ट्रिमिंगही केलं जातं. या अहवालानुसार, एकाच वेळी 2 कोटी लोकांची तस्करी केली जाते आणि त्यापैकी 25% पेक्षा जास्त सेक्स गुलाम म्हणून विकले जातात, असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.