Hide WhatsApp Chat: भारतासह जगभरात WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुम्हा कुणालाही काहीही मेसेज करायचा झाल्यास, व्हिडीओ कॉल करायचा झाल्यास तुम्ही थेट WhatsApp चा वापर करतात.
WhatsApp चा वापर करत असताना यावर तुम्ही अनेक सिक्रेट गोष्टीही शेअर करतात. मात्र तुम्ही जेंव्हा ट्रेन, बस किंवा सार्वजनिक ठिकाणी WhatsApp चा वापर करतात तेंव्हा अनेकांच्या नजरा तुमच्या फोनमध्ये असतात.
अशात तुमची प्रायव्हसी राखली जावी म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
सार्वजनिक ठिकाणी तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्ती जर तुमच्या फोनमध्ये डोकावत असेल किंवा तुमचे चॅट्स वाचत असेल तर तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल.
या बातमीत आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या फोनमध्ये डोकावणाऱ्यांना काहीही दिसणार नाही.
तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुमचे चॅट्स वाचू नये म्हणून तुम्हाला काही सध्या गोष्टी कराव्या लागतील. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून MaskChat-Hides Chat इन्स्टॉल करावं लागेल.
अँड्रॉइडवर तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. हे ऍप बिना जाहिरात वापरायचं झाल्यास तुम्हाला subscription घ्यावं लागेल.
या ऍपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे चॅट्स लपवून ठेवू शकतात. यामुळे तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला तुमच्या मोबाईल स्क्रीनवरील काहीही दिसत नाही. यामुळे तुम्ही बिनधास्त चॅट करू शकतात.
या ऍपला योग्य परमिशन्स दिल्यानंतर याचा वापर तुम्ही WhatsApp, Instagram Facebook साठीही करू शकतात.
हे ऍप ओपन होताच तुम्हाला स्क्रीनवर एक फ्लोटिंग मास्क आयकन पाहायला मिळेल. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिजिटल पडदा किंवा वॉलपेपर येईल. यामुळे तुम्ही तुमची स्क्रीन लपवू शकतात.
how to hike your mobile screen in public places like train and buses