सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर

नियमांचे पालन केल्यावरच होणार पोर्ट 

Updated: Dec 16, 2019, 02:51 PM IST
सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर title=

मुंबई : मोबाईल पोर्ट (MNP)करण्यासाठी आता एक आठवडा थांबण्याची गरज नाही. टेलिकॉम रेग्यलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नियमांनुसार ही प्रक्रिया पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. आता फक्त तीन दिवसांत ही प्रक्रिया होणार असून 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

MNP च्या नियमांनुसार ग्राहक आपला नंबर बदलल्याशिवाय एका ऑपरेटरकडून दुसऱ्या ऑपरेटरकडे पोर्ट करू शकतो. या सगळ्या बदलाला आता फक्त तीन दिवसांचा वेळ लागणार आहे. या अगोदर सगळ्या प्रक्रियेला सात दिवस लागत असतं. 

हे आहेत नियम 

ट्रायच्या नवीन नियमांनुसार पोस्टपेड कस्टमर्सला आपला मोबाईल नंबर पोर्ट करण्याअगोदर त्या कंपनीचं सगळ बिल भरणं अनिवार्य आहे. पोस्टपेडची पूर्ण रक्कम भरल्यावरच नंबर पोर्ट करण्यासाठी स्विकारला जातो. 

नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना फक्त कामाच्या तीन दिवसांत आपलं मोबाईल क्रमांक पोर्टकरून मिळेल. याकरता टेलिकॉम रेग्युलेटर 6.46 रुपयाचे ट्रान्झेशन फी आकारणार आहे.   

तसेच कोणत्याही कंपनीत नंबर पोर्ट करण्यासाठी युझरचे ते कनेक्शन कमीत कमी 90 दिवस पूर्ण केलेले असावे. 

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या वाढतेय 

भारतात यावेळी 1.17 बिलियन मोबाईल युझर आहेत. ज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जवळपास 5.36 मिलियन सबस्क्रायबर्सनी आपला नंबर पोर्ट करून घेतला आहे. ट्रायच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात मोबाईलची संख्या वाढणार आहे. 

UPC कोडतर्फे पोर्ट होणार नेटवर्क 

ट्रायमार्फत जाहीर केलेल्या नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युनिक पोर्टिंग कोड तेव्हाच जनरेट होणार जेव्हा युझर नंबर पोर्टचे सर्व नियम पाळणार. वर दिलेल्या सर्व नियमांना पूर्ण करून ग्राहक आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करू शकतो.