Traffic Rules: अशा बाइक बघता क्षणीच वाहतूक पोलिसांची पडते वक्रदृष्टी, ही चूक तुम्ही तर करत नाही ना

मोटारसायकलमधील असा बदल तुमच्यासाठी ठरेल डोकेदुखी, जाणून घ्या

Updated: Jul 31, 2022, 03:10 PM IST
Traffic Rules: अशा बाइक बघता क्षणीच वाहतूक पोलिसांची पडते वक्रदृष्टी, ही चूक तुम्ही तर करत नाही ना title=

Traffic Challan Rules for Bike Riders: बाइक चालवताना वाहतूक पोलिसांची नजर आपल्यावर पडू नये, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण काही ना काहीतरी कारण शोधून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतील, अशी भीती असते. त्यामुळे प्रत्येक बाइकस्वार हेल्मेट, पीयूसी, इन्शुरअन्स, लायसन्स आणि आरसी बूक जवळ बाळगतो. पण या व्यतिरिक्त देखील वाहतुकीचे काही नियमांमुळे दंड भरावा.  या व्यतिरिक्त तुमची एक चूक तुम्हाला दंड भरण्यास कारणीभूत ठरू शकते. कारण वाहतूक पोलिसांची नजर अशा मोटारसायकलवर पडली की, दंड झालाच समजा. अशी बाइक वाहतूक पोलीस लगेच बाजूला घेण्यास सांगतात. सुरुवातीला सर्व पेपर चेक केल्यानंतर तुम्ही केलेली चूक निदर्शनास आणून देतात. या चुका कोणत्या जाणून घेऊयात.

नंबर प्लेट फेरफार: कोणत्याही वाहनाची ओळख ही त्याच्या नंबर प्लेटवरून होत असते. बाइक कोणत्या भागातील आहे, तसेच सीरिज कोणता यावरून वाहतूक पोलिसांना लगेच अंदाज येतो. पण काही जणांना या व्यतिरिक्त फॅन्सी नंबर प्लेटचं आकर्षण असतं. त्यामुळे त्यात फेरफार केले जातात. पण ही चूकच नंतर महागात पडते. नंबर प्लेटवर स्टिकर लावले असतील नंबर ओळखणं कठीण होतं. यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन होत आणि दंड भरावा लागतो.

हेडलाइट आणि टेललाइटमध्ये बदल: जर तुम्ही तुमच्या मोटारसायकलच्या हेडलाइट किंवा टेललाइट बल्बमध्ये काही बदल केला असेल. तसेच हेडलाइट आणि टेल लाइटवर कव्हर लावले असेल, ज्यामुळे दुसऱ्या रंगाचा प्रकाश पडत असेल. तर तुम्ही वाहतूक पोलिसांच्या रडारवर याल. वाहतूक पोलिसांना लाइट दिसताच तुम्हाला ताबडतोब थांबवले जाईल. तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.