टोयोटाने लाँच केली आपली सर्वात स्वस्त SUV, किंमत फक्त 7 लाख 74 हजार; जाणून घ्या मालयेज आणि फिचर्स

सुझुकी आणि टोयाटादरम्यान झालेल्या कराराअंतर्गत तयार करण्यात आलेली ही आणखी एक नवी एसयुव्ही आहे. ही एसयुव्ही Maruti Fronx चं बॅज इंजिनिअर्ड व्हर्जन आहे. कंपनीने सीएनजी व्हेरियंटमध्ये ही कार लाँच केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 03:02 PM IST
टोयोटाने लाँच केली आपली सर्वात स्वस्त SUV, किंमत फक्त 7 लाख 74 हजार; जाणून घ्या मालयेज आणि फिचर्स title=

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त एसयुव्ही Toyota Taisor लाँच केली आहे. ही कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अर्बन क्रूझर सीरीजमध्ये येणारी ही एसयुव्ही Maruti Fronx चं बॅज इंजिनिअर्ड व्हर्जन आहे. म्हणजे या कारचं मूळ स्वरुप फ्राँक्सची आहे. पण यामध्ये कंपनीने काही मोजके बदल केले आहेत. Toyota Taisor ची सुरुवातीची किंमत 7 लाख 74 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप व्हेरियंटची किंमत 13 लाख 4 हजारापर्यंत जाते. 

रिबॅज व्हर्जन असल्याने Urban Cruiser Taisor मधील जवळपास सर्व बॉडी पॅनल मारुती फ्राँक्सप्रमाणे आहेत. पण थोडासा बदल केलेले हनीकॉम्ब पॅटर्नच्या नव्या डिझाइनचा फ्रंट गिल आणि बंपर पाहायला मिळतो. एलईडी डीआरएलमध्ये फ्राँक्समध्ये देण्यात आलेल्या 3 क्यूब्सच्या जागी लिनिअर डिझाईन पाहायला मिळतं. टेल लाइट्समध्येही बदल करण्यात आला आहे. याशिवाय Toyota Taisor मध्ये नव्या डिझाइनचे 16 इंच डायमंड कट अलॉय व्हिल्स मिळतात. 

Toyota Taisor च्या इंटिरिअरमध्येही थोडे बदल करण्यात आले आहेत. आतील बाजूला ड्युअल टोन ब्राउन आणि ब्लॅक अपहोल्स्ट्री मिळते. याशिवाय 9 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह येते. तसंच क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी असे फिचर्सही देण्यात आले आहेत. 

Toyota Taisor मध्ये कंपनीने फ्राँक्सच्यात 1.2 लीटर, चार सिलेंडर नॅच्यूरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लीटर, तीन सिलेंडर टर्बो पेट्रोलचा पर्याय दिला आहे. नॅच्यूरली एस्पिरेटेड इंजिन 90hp ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन किंवा पर्यायी AMT सह जोडण्यात आलं आहे. टर्बो पेट्रोल इंजिन 5 स्पीड मॅन्यूअलसह ऑप्शनल 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह उपलब्ध आहे. टोयोटाच्या या एसयुव्हीत सीएनजीचा पर्याय मिळतो. 

सुरक्षेसाठी एसयुव्हीत 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि आयएसओफिक्स चाईल्ड सीट एंकरेज देण्यात आलं आहे. कारमध्ये ग्राहकांना रंगांचेही अनेक पर्याय देण्यात आले आहेत. 

कंपनीचा दावा आहे की, Toyota Taisor चं टर्बो पेट्रोल मॅन्यूअल ट्रान्समिशन व्हेरियंट 21.5 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट 20.0 किमी/लीटरचा मायलेज देते. तर 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंटमध्ये 21.7 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 22.8 किमी/लीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. त्याचं CNG व्हेरियंट प्रति किलो 28.5 किलोमीटर पर्यंत कमाल मायलेज देईल.