Tips and Tricks: तुम्हीही विसरलाय का तुमच्या WiFi चा पासवर्ड? मग वापरा या सोप्या ट्रिक्स

तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड विसरला असाल आणि तो पुन्हा रिकव्हर करायचा असेल तर या ट्रिक्स नक्की वापरून पाहा

Updated: Sep 6, 2021, 04:48 PM IST
Tips and Tricks: तुम्हीही विसरलाय का तुमच्या WiFi चा पासवर्ड? मग वापरा या सोप्या ट्रिक्स title=

मुंबई: आज प्रत्येकाच्या घरी जवळपास वायफाय असतं. वर्कफ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण यामुळे अनेकांनी डेटा पॅक कमी आणि वायफायचा वापर जास्त करायला सुरुवात केली आहे. बऱ्याचदा आपलं वायफाय कनेक्ट होण्यात प्रॉब्लेम होतो. आपण फोन रिसेट करतो किंवा काही कारणांमुळे आपल्या वायफायचा पासवर्ड आपल्याकडून जातो. जर हा पासवर्ड आपल्या लक्षात राहिला नसेल तर तो पुन्हा कसा मिळवायचा त्याची ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काहीवेळा आपल्या घरात पाहुणे किंवा मित्र-मैत्रिणी येतात त्यांना हा पासवर्ड शेअर करायचा असतो. त्यावेळी हा पासवर्ड कसा शोधायचा याची ही ट्रिक तुमच्या कामाला येऊ शकते. तुम्ही जर एन्ड्रॉइड 10च्या वरील व्हर्जनचा स्मार्टफोन वापरत असाल तर त्यामध्ये वायफायचा पासवर्ड सेव्ह राहातो. अशा फोनला तुमच्या वायफाय पासवर्ड सेव्ह असतो. त्यामुळे तुम्ही नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन तिथे वायफाय पासवर्ड पाहू शकता. 

तुमचा स्मार्टफोन एन्ड्रॉईड 9 वर असेल तरीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही सेव्ह केलेला वायफाय पासवर्ड पाहण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. हे करण्यासाठी तुम्हाला तुमचे डिव्हाइस रूट करावं लागेल. सेव्ह केलेल्या नेटवर्कसाठी वायफाय क्रेडेन्शियल असलेली फाईल तुमच्या फोनच्या स्टोरेजच्या प्रोटेक्टेड डायरेक्टरीमध्ये सेव्ह असते. 

फोन रूट केल्यानंतर रूट ब्राउझिंगला सपोर्ट करणाऱ्या फाइल एक्सप्लोरर एपच्या मदतीनं /data/misc/wifi हा पर्याय निवडा. wpa_supplicant.conf पर्याय निवडा. तिथे तुमच्या नेटवर्कचं नाव उदा. (ssid) आणि पासवर्ड (psk)  दिसेल. तुम्ही यासाठी वायफाय व्यूअर एपचाही वापर करू शकता. 

एन्ड्रॉइड 10 किंवा त्यावरील स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी वायफाय पासवर्ड पाहण्यासाठी, तुम्हाला आधी सेटिंग्जमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर नेटवर्क आणि इंटरनेट पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला वायफायवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला आता सध्या कुठलं वायफाय सुरू आहे ते दिसेल. त्यावर सिलेक्ट करा. तो निवडा आणि नंतर शेअर बटण निवडा. यानंतर, युझर्सना पुढे जाण्यासाठी त्यांच्या फोनचा पिन कोड किंवा फिंगरप्रिंट टाकावा लागेल. हे केल्यानंतर, तुम्हाला QR कोड अंतर्गत तुमचा वायफाय पासवर्ड मिळेल.