भारतीय बाजारात Tiktokकडून नवं app लॉन्च

'बाइट डान्स' ही 'टिकटॉक'ची पॅरेंट कंपनी आहे.

Updated: Mar 6, 2020, 01:06 PM IST
भारतीय बाजारात Tiktokकडून नवं app लॉन्च title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म 'टिकटॉक'च्या मदतीने 'बाइट डान्स'ने आपली पकड आणखी मजबूत करत, भारतीय बाजारात 'Resso' हे नवीन ऍप बाजारात आणलं आहे. कंपनीने आपल्या नवीन ऍपद्वारे म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. 'बाइट डान्स'ने Resso या नावाने नवी म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस लॉन्च केली आहे. भारतात आधीपासून या क्षेत्रात अनेक कंपन्यांचे ऍप उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात या ऍपची थेट स्पर्धा JioSaavn, Gaana, Spotify, Apple Music आणि YouTube Musicशी होणार असल्याचं बोललं जात आहे.

'बाइट डान्स'चं हे नवं 'Resso' ऍप बाजारात असलेल्या इतर ऍपप्रमाणेच काम करतं. पण यात असणारे काही नवे फिचर्स, या ऍपला इतर ऍप्सशी टक्कर देण्यात मदत करणार आहेत. कंपनीने या ऍफमध्ये सोशल एलिमेंट जोडलं आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स म्युझिक ट्रॅक आणि इतर श्रोत्यांशी संवाद साधू शकतात. या सोशल फिचरमुळे गाणी ऐकण्याचा अनुभव अधिक चांगला होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

या ऍपद्वारे यूजर्स म्युझिक वाईब्सच्या अनुभवासह म्युझिक शेअरही करु शकतात. याशिवाय यूजर्स कोणत्याही म्युझिक ट्रॅकवर कमेंट किंवा लाईक करु शकतात. त्यावर केलेल्या कमेंट इतर यूजर्सही पाहू शकतात. यूजर्सना लिरिक्स कोट शेअर करण्याचाही पर्याय मिळणार आहे. यूजर्स फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअपवरही हे शेअर करु शकतात. म्युझिक ट्रॅक प्ले केल्यानंतर हे लिरिक्स स्क्रिनवर दिसतील.

या फिचरद्वारे यूजर कोणत्याही म्युझिक ट्रॅकद्वारे स्वत:ला व्यक्त करु शकतात. यासाठी ते जीआयएफ, फोटो, व्हिडिओचा वापर करु शकतात. 'बाइट डान्स'चं हे ऍप आयओएस आणि ऍन्ड्रॉईड या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे. सध्या हे ऍप विनामूल्य आहे. पण ही विनामूल्य सेवा मर्यादित काळासाठी आहे. ऍड्रॉईड यूजर्स दरमहा ९९ रुपये आणि आयओएस यूजर्सला दरमहा ११९ रुपये खर्च करुन याला सब्सक्राईब करु शकतात.