मुंबई : Mahindra & Mahindraची सबसिडरी असणारी क्लासिक आणि तितकीच लोकप्रिय अशी BS6-compliant Jawa बीएस ६ कॉम्प्लायंट जावा आणि and Jawa Forty Two जावा फोर्टी टू अखेर भारतीयांच्या भेटीला आली आहे. नुकतंच या बाईकचं अनावरण करण्यात आलं. सोशल मीडियापासून ते विविध स्तरांवरील बाईकप्रेमींमध्ये आता 'जावा'चीच चर्चा सुरु आहे.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर बाईक प्रेमींसमक्ष आलेल्या या बाईकच्या किंवा या क्लासिक दुचाकीच्या किंमतीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. बीएस ६ची किंमत १.७३ लाख रुपये (ex-showroom) आणि जावा फोर्टी टू बीएस ६ Jawa Forty Two BS6ची किंमत १.६० लाख (ex-showroom)पासून सुरु होत आहे.
क्लासिक लेजेंड्सकडून लाँच करण्याच आलेली BS6 ही दुचाकी काळा, राखाडी आणि मेहरुनी अर्थात मरुन या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. सिंगल आणि ड्युअल चॅनल अशा ABS पर्यायांमध्ये ही जावा उपलब्ध आहे. या दोन्ही बाईकच्या किंमती पाच हजार रुपयांपासून ९ हजार ९२८ रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'
BS6 कॉम्प्लायंट जावा बाईक ही क्रॉस पोर्ट तंत्र असणारी भारतातील पहिली बाईक ठरत आहे. BS4 वेरियंटप्रमाणेच जावा आणि जावा फोर्टी टूचं इंजिन 27Bhpची पीक पॉवर आणि 28 Nmचं पीक टॉर्क जनरेट करतं. या दुचाकीला 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सस्पेंशन सेटअपविषयी सांगावं तर, पुढे टेलिस्कोपिक फॉर्क आणि रिअरला (मागे) ड्युअल शॉक्स देण्यात आला आहे. बाईकचे एकंदर गुणविशेष पाहता लांबच्या प्रवासासाठी निघणाऱ्या रायडर्सना अर्थात बाईकस्वारांना ही जावा अधिक भावणार यात शंका नाही.